Sesame Seeds Puries: English Version
साहित्य:
- मैदा : १ कप
- गव्हाचे पीठ : ३/४ कप
- तुप : २ टेबल स्पून
- मिरे पुड : १/२ टी स्पून
- बारीक़ चिरलेली हिरवी मिरची : २
- बारीक़ चिरलेली कोथिंबीर: १ कप
- भाजलेले तीळ: १/२ कप
- लवंग
- चवीनुसार लाल मिरची पुड
- चवीनुसार मीठ
- तळण्यासाठी तेल
कृती:
- तेल सोडून सगळे साहित्य एका पराती मधे एकत्र करा. थोडे थोडे पाणी टाकून पीठ चांगले मळून घ्या. आपल्या नेहमीच्या पुरीच्या काणिके सारखीच ही कणीक असु द्यावीत. ही कणीक तशीच अर्धा तास झाकून ठेवा.
- ह्या कणिकेचे छोटे छोटे गोळे करून ठेवा. एक गोळा घेऊन त्याची पुरी लाटा. ह्या पुरीवर थोडे भाजलेले तीळ आणि पाणी शिंपडा. ही पुरी आर्धि दुमडा आणि परत दुमडून त्याचा त्रिकोण तयार करा. पुरीचे पदर सुटू नये म्हणून पुरीच्या मधोमद लवंग खोचा. अशा सगळ्या पुर्या करून घ्या.
- एका कढई मधे तेल गरम करून ह्या सगळ्या पुर्या बदामी रंगाच्या होईपर्यंत तळा.
- ह्या गरमागरम पुर्या तुम्ही कोणत्याही केच अप, चटणी किंवा सॉस बरोबर खावा.
सौजन्य:
No comments:
Post a Comment