गाजर आणि सफरचंदाचे साल कढून घेऊन त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करा.
एका जाड बुडाच्या भांडयामध्ये लोणी गरम करायला ठेवा. लोणी गरम झाल्यावर त्यात कांदा टाका. हा कांदा लालसर होईपर्यंत भाजा.
नंतर त्यात कापलेले गाजर, सफरचंद, आले, मीठ, मीरे पुड, वेजिटेबल स्टॉक / चिकन स्टॉक/ पाणी घालून चांगले हलावा. ह्या मिश्रणालाचांगली उकळी आली की भांडयावर झाकण ठेवून मंद आचेवर थोडावेळ शीजू द्या. गाजर शिजले की भांडे बाजुला काढा.
हे मिश्रण मिक्सर मध्ये घालून चांगले बारिक करून घ्या. एक भांडयामध्ये हा सुप परत गरम करा. हा गरमागरम सुप कोणालाही कधीही प्यायला आवडेल.
**** Grilled Watermelon Salad -English Version **** साहित्य:
कलिंगडच्या मोठ्या फोडी: २
चेरी: ८-१०
हिरवी द्राक्षे: ८-१०
ओलिव तेल: १ टी स्पून
संत्र्याचा रस: १ टेबल स्पून
लिंबाचा रस: १ टेबल स्पून
चाट मसाला: गरजेनुसार
कृती:
कलिंगडच्या फोडीचे छोटे छोटे तुकडे करा. ते तुकडे ग्रिल वर १ मिनिटे भाजा. जर तुमच्या कडे मोठे ग्रिल असेल तर कलिंगडच्या मोठ्या फोडीच ग्रिल करा आणि नंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करा.
चेरी च्या बिया काढा. चेरी आणि द्राक्षाचे ४ तुकडे करा.
सगळे साहित्य एका भांड्यामधे चांगले एकत्र करून घ्या. झाले तुमचे ग्रिल कलिंगड सलाड तयार.