Maharashtrian Goda Masala (Kala Masala)
इंग्लिश मधून वाचण्यासाठी इथे टिचकी मारा.
साहित्य
धने: ४ वाटी
खोबर्या चे तुकडे: १ वाटी
तीळ: १/२ वाटी
जिरे: १/४ वाटी
शहाजिरे: ३ टीस्पुन
लवंगा: २ टीस्पुन
दालचिनी: ४-५ बॉटभर लांबीचे तुकडे
हिंग पूड: २ टीस्पुन
तमालपत्र: ५-६ पाने
दगडफुल: २-३
हळद: १ टीस्पुन
लाल मिरची पूड: १/२ वाटी
मीठ: १/४ वाटी
तेल: १/४ वाटी
मोहरी: १ टीस्पुन
मेथी: १/२ टीस्पुन
कृती:
तीळ भाजून घ्यावेत. तेलावर खोबरे तांबुस रंगावर तळावे. नंतर त्यात लवंग, दालचिनी, जिरे, शाहजिरे, तमालपत्र, दगडफुल, मेथी, मोहरी व धणे तळावे. नंतर त्यात तीळ, खोबरे, हिंग निरनिराळे बारीक करून घ्यावे. मग बाकीचे सगळे साहित्य बारीक करून चाळनीने चाळुन घ्यावे. नंतर सगळे बारीक केलेले साहित्य एकत्र करून त्यात हळद, लाल मिरची पूड व मीठ घालून पुन्हा एकदा बारीक करावे. सगळे पदार्थ नीट एकत्र करून घावेत.
मसाला तयार झाल्यावर हवाबंद बरणीत भरून घट्ट झाकण लावून ठेवावे.
सौजन्य:
रुचिरा: कमलाबाई ओगले
Khupch chan
ReplyDelete