कटाची आमटी (Chana Daal Rassam)

Katachi Aamatiइंग्लिश मधून वाचण्यासाठी इथे टिचकी मारा.

साहित्य
कट (चणा डाळ जास्त पाण्यात उकडून घेऊन डाळ बाजूला काढून उरलेले पाणी): २ वाटी
शीजलेली चणा डाळ: १/४ वाटी
कढीपत्ता: ६-७ पाने
कापलेला कांदा: १/२ वाटी
वाळलेले खोबरे: १ टेबल स्पून
आले - लसूण पेस्ट: १ टीस्पून
तीळ: १ टीस्पून
जीरे: १ टीस्पून
हिंग चिमूटभर
कांद्याचा मसाला: २ टेबल स्पून
बारीक कापॅलेली कोथिन्बीर
चिंचेचा कोळ: २ टीस्पून
गुळ: १ टीस्पून
चवीनुसार मीठ
तेल
पाणी

कृती
१) उकडलेली डाळ पाणी घालून बारीक करून घ्या. पाणी थोडे जास्त घातले तरी चालेल.
२) तीळ, खोबरे आणि कांदा वेगवेगळे भाजून घ्या. कांदा भाजताना थोडे तेल घालावे. भाजलेले साहित्य गार झाल्यावर आले - लसूण पेस्ट घालून बारीक करून घ्यावे. गरज पडली तर थोडे पाणी घालावे.
३) एका पातेल्यात तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात जीरे, कढीपत्ता, हिंग ची फोडणी करा. नंतर त्यात बारीक केलेला कांदा, खोबरे इत्यादीची पेस्ट घाला. पेस्ट नीट हलवा. जोपर्यंत मसाला तेल सोडायला सुरूवात करत नाही तोपर्यंत मसाला हलवा. नंतर कांद्याचा मसाला टाकून ३-४ मिनिटे भाजा.
४) नंतर कट आणि डाळीची पेस्ट टाका. गरज असेल तर थोडे पाणी टाका. आमटीला थोडी उकळी आल्यावर त्यात चवीनुसार मीठ, चिंच आणि गुळ टाका. आमटी परत २-३ मिनिटे उकळू द्या.
५) आमटी झाल्यावर चिरलेली कोथिंबीर भूरभुरा. ही आमटी गरमा गरम पियू शकता किवा पुरणपोळी बरोबर किवा गरमागरम भाताबरोबर खाऊ शकता.

2 comments:

  1. Delicious. It really goes well with Puran poli.

    ReplyDelete
  2. धन्यवाद हरेक्रिश्नाजी.

    ReplyDelete