साहित्य
लाडू बेसन: २ वाटी
पिठी साखर: १ वाटी
तूप: ३/४ वाटी
दूध: १/४ वाटी
वेलदोडा पूड: २ टी स्पून
कापलेले बदाम, काजू आणि बेदाणे: पाहिजे तितके
कृती
एका जाड बुडाच्या भांड्यामधे तूप गरम करायला ठेवा. तूप गरम झाले की त्यात थोडे थोडे करून बेसन घाला. गाठी होऊ देऊ नका. बेसन आणि तूप चांगले एकत्र करा. हे बेसन बदामी होईपर्यंत भाजा. बदामी रंग आल्यावर भांडे खाली उतरवा. नंतर त्या बेसन मधे दूध शिपडा. बेसन चांगले कोरडे होईपर्यंत नीट हलवा. हे बेसन गार होण्यासाठी ठेऊन द्या. बेसन थोडे कोमट झाले की त्यात साखर, वेलदोडा पूड घालून नीट एकत्र करा. हे मिश्रण पूर्ण गार झाल्यावर एका ताटात चांगले मळुन घ्या. नाहीतर मिक्सर हे मिश्रण मिक्सर मधून काढले तरी चालेल. त्यात कापलेले बदाम, काजू , बेदाणे घाला आणि त्याचे लाडू वळावेत. साधारणपणे ह्याचे १५-२० लाडू होतील. हे लाडू थोडावेळ तसेच उघडे ठेवावे म्हणजे ते कोरडे होतील. एकदा का लाडू कोरडे झाले की ते हवाबंद डब्यात ठेवा. हे लाडू १५-२० दिवस चांगले राहतील.
Besan Ladu khupach sunder disat aahe!
ReplyDeleteApalya site la barech khadya premi bhet det asatat... mee dekhil kadhi kadhi bhet deto. Tyana kahi vaicharik khavu dyava ase watat asel tar mazya cartoon blog chee link dya.. http://minanath.blogspot.com. Offcourse maza blog tya patratecha asel tarach.
ReplyDeleteDhanyawaad.
Namaskar, Khupacha Chhan aani Sopya receipe aapan aaplya website vaar deta aani kharokharach Swayapak Shastra (Paak Kala) kiti chhan aahe ...paan ek gosht ki aamhi content copy karun ghari karu icchito..taar aapan tashi suvidha purvavit
ReplyDeleteDattaram Walvankar
98677 60636
dattaram.walvankar@gmail.com
Dhanyawad Minanath, Dattaram.
ReplyDeleteDattaram, tumhi hi recipe ghari karu shakata
Mi besan ladoo karte tevha kiti hi kalji ghetali tari gaathi hotat.. Maze kuthe chukate ladoo karatana. Ka gaathi hotat.
ReplyDeleteKhupch chan recipe. Mast sangitle apan
ReplyDelete