व्हेज लॉलीपॉप (Veg Lollipop)


इंग्लिश मधून वाचण्यासाठी इथे टिचकी मारा.

साहित्य
बारीक चिरलेला कोबी: १ वाटी
बारीक चिरलेला फ़ॉवर: १ वाटी
बारीक चिरलेले किंवा किसलेले गाजर: १/२ वाटी
बारीक चिरलेल्या ग्रीन बीन्स: १/४ वाटी
बारीक चिरलेला कांदा: ३/४ वाटी
बारीक चिरलेली कोथिंबीर: १/२ वाटी
बारीक चिरलेली ढबु मिरची: १/२ वाटी
बारीक चिरलेले किंवा किसलेले बीट: १/४ वाटी
फ्रेश / फ्रोज़न वाटणा: १/२ वाटी
मैदा : १ वाटी
कॉर्नफ़ॉवर: १ टी स्पून
लहान ब्रेडस्टीकस: १२ -१५
आले - लसूण - मिरची पेस्ट: १ टेबल स्पून
चवीनुसार मीठ
तळण्यासाठी तेल

कृती
१) सगळ्या कापलेल्या भाज्या, कांदा, कोथिंबीर आणि चवीपुरते मीठ टाकून एकत्र करा. हे एकत्र केलेले मिश्रण १५ - २० मिनिटे तसेच ठेवा.
२) तोपर्यंत मैदा एका तव्यावर कोरडा भाजून घ्या आणि गार करायला ठेवा.
३) १५-२० मिनिटे झाल्यावर मिश्रणात जास्त झालेले पाणी पिळून काढा. हे पाणी फेकून देऊ नका. हे पाणी तुम्ही भाजी किंवा सूप करण्यासाठी वापरु शकता. तसेच जर भाज्यांचे मिश्रण जर जास्त कोरडे झाले तर हे पाणी वापरु शकता.
४) नंतर ह्या मिश्रणात आले - लसूण - मिरची पेस्ट, भाजलेला मैदा आणि कॉर्नफ़ॉवर घाला. हे मिश्रण चांगले मिक्स करा.
५) ह्या मिश्राणाचे दंडगोलाकार गोळे करा. एका गोळयामधे एक ब्रेड स्टिक घुसवा आणि गोळा चांगला दाबा. असे सगळे गोळे तयार करून घ्या.
६) एका कढई मधे तेल चांगले गरम करा आणि हे सगळे गोळे तांबुस रंगावर तळुन घ्या.
७) हे गरमागरम लॉलीपॉप कोणत्याही चटणी किंवा सॉस बरोबर खावा.

टिप
१) ह्या सगळ्या भाज्या एवजी तुम्ही तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही घालू शकता. ह्यात तुम्ही शिजवून खीसलेला बटाटा पण घालू शकता.
२) तुम्हाला जर तळलेले पदार्थ आवडत नसतील तर तुम्ही हे ओवेन मधे सुधा बेक करू शकता.

सौजन्य
आम्ही सारे खवय्ये.

3 comments: