बंगाली खिचुरी (Bengali Khichuri)

Bengali Khichuri


साहित्य
बासमती तांदुळ: १/२ वाटी
मुगाची डाळ: १/२ वाटी
बारीक कापलेला कांदा: १/२ वाटी
बारीक चिरलेल्या भाज्या ( फ़्लॉवर, गाजर,बटाटा, वाटणा इत्यादी) : १ वाटी
आले पेस्ट: ३/४ टी स्पून
जीरे: १ टी स्पून
तमाल पत्र: २
हळद: १/४ टी स्पून
लाल मिरची पूड: १ टी स्पून
धणे पूड: १ टी स्पून
गरम मसाला: १ टेबल स्पून
चवीनुसार मीठ
पाणी
तेल
तूप

कृती
मुगाची डाळ तांबुस होईपर्यंत भाजा आणि गार होण्यासाठी बाजूला ठेऊन द्या.तांदूळ चांगले २-३ वेळा धुवून घ्या आणि सगळे पाणी काढून तांदूळ बाजूला ठेवा.

एका जाड बुडाच्या भांड्यात तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यावर जीरे टाका. जीरे चांगले तडतडून झाल्यावर तमाल पत्र टाका. नंतर बारीक चिरलेला कांदा टाका. कांदा तांबुस रंगाचा झाल्यावर आले पेस्ट टाका. १ मिनिटे चांगले भाजा. नंतर तांदूळ, डाळ, भाज्या टाका. २-३ मिनिट हे सगळे पदार्थ नीट भाजू द्या. त्यात २ वाटी गरम पाणी तसेच चवीपुरते मीठ टाका. पाणी चांगले उकळल्यावर गॅस कमी करा आणि भांडयावर झाकण ठेवा. गरज पडली तर थोडे गरम पाणी अजुन टाका. खिचुरी पूर्ण शीजल्यावर त्यात गरम मसाला आणि तूप टाका. खिचुरी चांगली हलवा, झाकण परत ठेवा आणि गॅस बंद करा.

ही गरमा गरम खिचडी कोणत्याही लोणच्याबरोबर, पापडा बरोबर किंवा भाजी बरोबर खावा.

No comments:

Post a Comment