नाचणी आणि कारल्याचा उत्तपा (Ragi Karela Utappa)

Ragi & Karela Uttapaही रेसिपी इंग्लिश मधे वाचण्यासाठी इथे टिचकी मारा.

साहित्य
नाचणी पीठ: २ वाटी
बेसन अथवा तांदळाचे पीठ: १ वाटी
बारीक कापलेले कार्ले: १ वाटी
बारीक चिरलेला कांदा: १/४ वाटी
बारीक चिरलेला टोमॅटो: १/४ वाटी
बारीक चिरलेले गाजर: १/४ वाटी
बारीक चिरलेली कोथिंबीर: १/४ वाटी
बारीक चिरलेली हिरवी मिरची: २ टी स्पून
तेल
चवीपुरते मीठ
पाणी

कृती
तेल सोडून वर दिलेले सगळे साहित्य एकत्र करून छान से पीठ भिजवा. हे पीठ जास्त पातळ पण असु नये आणि जास्त घट्ट पण असु नये.

एक नॉन स्टिक तवा गरम करा. त्यावर थोडे तेल सोडा आणि मग त्यावर १ डाव पीठ टाकून ते चांगले गोल पसरवा. त्या पसरवलेल्या पीठाच्या बाजूने थोडे तेल सोडा आणि तो उत्तपा झाकून ठेवा. २ मिनिटनंतर तो उत्तपा उलटून त्या बाजूने सुद्धा चांगला भाजा.

हा गरमागरम उत्तपा तुम्ही कुठल्याही चटणी अथवा सॉस अथवा लोणच्या बरोबर खाऊ शकता. हा उत्तपा डयबेटिक असलेल्याना फार चांगला आहे.

1 comment: