नट्सकडे आपण केवळ मधल्या वेळेतलं खाणं म्हणून पाहतो. पण याच नट्समध्ये भरपूर प्रोटिन्स, जीवनसत्वं, खनिजं आणि हेल्दी ऑइल्सही (विशेषत: 'ई' जीवनसत्व) असतात. ऊतींची वाढ आणि डागडुजीसाठी प्रोटिन्स आवश्यक असतात. तर फॅट्समधून शरीराला आवश्यक फॅटी अॅसिड्स मिळतात. एकदा का नट्स खाण्यास सुरुवात केली की हात आणि तोंड थांबवणं शक्य होत नाही. नट्स अगदी मूठभर खावेत, वाडगाभर नव्हते. नट्स खाण्यावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. अन्यथा वजनवाढीचा धोका संभवतो.
बदाम :
पोषक घटक: कॅल्शिअम, फायबर, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, फॉलिक अॅसिड
फायदे: त्वचेचे विविध विकार, बद्धकोष्ठता आदींमध्ये बदामाचं तेल उपयोगी पडतं. इतर नट्सच्या तुलनेत बदामात अधिक कॅल्शिअम आणि फायबर असतं. बदामातल्या पोषक घटकांमुळेच त्याला 'नट्सचा राजा' म्हटलं जातं. सौंदर्यप्रसाधनांमध्ये बदामाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. बाळांची त्वचा मृदु राहावी म्हणून त्यांना बदामच्या तेलाने मालिश केली जाते.
शेंगदाणे :
पोषक घटक: प्रोटिन्स, फायबर, लोह, कॅल्शिअम, सोडिअम, पोटॅशिअम, 'अ', 'ब' आणि 'क' जीवनसत्व
फायदे : शेंगदाण्यांमध्ये भरपूर प्रोटिन्स असतात. यात 'रेसव्हेरॅटोल' नावाचा घटक असतो जो हृद्विकारांमध्ये उपयोगी पडतो आणि रोगप्रतिकारशक्तीही वाढवतो
अक्रोड :
पोषक घटक: कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, पोटॅशिअम, सोडिअम, 'अ', 'ब' आणि 'क' जीवनसत्व
फायदे: मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी, हाड बळकट करण्यासाठी तसंच आतड्यांचं कार्य सुधारण्यासाठी अक्रोड उपयोगी ठरतं.
पिस्ता:
पोषक घटक: फॉस्फरस, पोटॅशिअम, सोडिअम, तांबं, मॅग्नेशिअम, 'अ', 'ब' आणि 'ई' जीवनसत्व
फायदे: पिस्त्यामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत तर होतेच शिवाय यकृत आणि मूत्रसंस्थेचं कार्यही सुधारतं.
काजू :
पोषक घटक: लोह, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि 'अ' जीवनसत्व
फायदे: अॅनिमिया बरा करण्यासाठी काजूचं सेवन उपयोगी ठरतं. तसंच त्वचेचा पोतही सुधारतो. काजूमुळे रोगप्रतिकारशक्तीही सुधारते.
सौजन्य
म.टा.
No comments:
Post a Comment