कच्छी दाबेली (Dabeli)


साहित्य:
 • पाव: ४
 • लोणी: २ टी स्पून
 • उकडलेले आणि कुस्करलेले बटाटे: २ मोठे
 • जीरे: १ टी स्पून
 • दाबेली मसाला: १ टेबल स्पून
 • हिंग: चिमूटभर
 • चिंचेची चटणी: १/२ वाटी
 • तेल: २ टी स्पून
 • चवीनुसार मीठ
 • शेंगदाणे: १/२ वाटी
 • बारीक़ कापलेला कांदा : १/२ वाटी
 • बारीक चिरलेली कोथिंबीर: १/२ वाटी
 • बारीक शेव: १/२ वाटी
 • डाळिंबाचे दाणे किंवा कापलेली काळी द्राक्ष: १/२ वाटी
 • लसूण चटणी: ३ टेबल स्पून
 • चिंचेची चटणी: ३ टेबल स्पून
कृती:
एका भांड्यामधे तेल गरम करा. त्यात जीरे फोडनीला टाका. नंतर हिंग आणि दाबेली मसाला टाकून चांगले १-२ मिनिटे भाजा. मसाला चांगला भाजला की त्यात कुस्करलेले बटाटे, मीठ आणि थोडे पाणी टाका. हे सगळे चांगले एकत्र करून ३-४ मिनिटे नीट शिजू द्या. नंतर भांडे गॅस खाली उतरवून त्यात चिंचेची चटणी टाका आणि चांगले मिक्स करा आणि गार करायला ठेवा.
शेंगदाणे चांगले तळुन घ्या आणि ते गरम असतानाच त्याला थोडे मीठ, लाल मिरची पूड लावून बाजूला ठेवा.
पाव मधोमध कापा। शेवटपर्यंत कापू नका. पावाचे दोनही तुकडे एकत्र राहतील असे कापा. पावाच्या दोनही तुकड्या ना आधी चिंचेची चटणी आणि नंतर लसूण चटणी लावा. पावाच्या खालच्या तुकड्यावर थोडे बटाट्याचे मिश्रण पसरवा. नंतर त्यावर बारीक चिरलेला कांदा, शेंगदाणे, कोथिंबीर, द्राक्षाचे तुकडे आणि शेव पसरवा आणि पाव बंद करा. एक तवा गरम करून त्यावर थोडे लोणी सोडा आणि पाव दोनही बाजूणी २ मिनिटे गरम करा. नंतर पावाच्या उघड्या बाजूना चिंचेची चटणी लावा आणि ती बाजू शेवे मधे बुडवा. आता काहीही विचार न करता ही दाबेली पटकन खोऊन टाका.

Kacchi Dabeli

Ingredients:
 • Pav/Buns : 4
 • Butter: 2 tsp
For Filling
 • Potatoes (Boiled & Mashed): 2 Large
 • Cumin Seeds/ Jeera: 1 tsp
 • Dabeli Masala: 1 tbsp
 • Asafoetida / Hing: Pinch
 • Oil: 2 tsp
 • Tamarind Chutney: 1/2 Cup
 • Salt to Taste
To Serve :
 • Roasted Peanuts: 1/2 Cup
 • Finely Chopped Onion: 1/2 Cup
 • Finely Chopped Coriander: 1/2 Cup
 • Very Thin Nylon Shev: 1/2 Cup
 • Pomegranate Seeds/Anar or Sliced Grapes: 1/2 Cup
 • Garlic Chutney / Mint Chutney : 3 tbsp
 • Tamarind Chutney : 3 tbsp

Procedure:
For Filling
 1. Heat oil in a pan. Add cumin seeds. When they crackle, add hing & Dabeli Masala. Fry for a minute.
 2. Then add smashed potato, salt , some water and mix well. Cook for 2-3 minutes.
 3. Remove from fire, add small amount of tamarind chutney and mix well. Keep aside.
To Serve
 1. Cut the pav horizontally without cutting through.
 2. Spread tamarind chutney evenly on both sides of pav.
 3. Then spread mint or garlic chutney evenly.
 4. Place a portion of the filling on the lower half of bun.
 5. Sprinkle some chopped onion, peanuts, coriander, shev, anar or grapes.
 6. Heat tava. Add some butter. Toast both sides for 1-2 minutes. Remove in a plate.
 7. Apply some tamarind chutney on the edges and sprinkle some shev on it and serve.

No comments:

Post a Comment