
Lentil Crepes With Methi Leaves : Read English Version Here
साहित्य:
- मूग डाळ: १ कप
- हरभरा डाळ: १/४ कप
- हिरवा हरभरा डाळ: १/४ कप
- उड़द डाळ: १/२ कप
- तुर डाळ: १/४ कप
- बारीक चिरलेली मेथी: १ कप
- चवीनुसार हिरवी मिरची, आले, लसूण पेस्ट
- शेंगदाना चटणी
- कडीपत्ता: ४-५ पाने
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- हळद
- चवीनुसार मीठ
कृती:
- सगळ्या डाळी धुवून कडीपत्ता घालून ७-८ तास किंवा रात्रभर भिजत ठेवा.
- ह्या भीजलेल्या डाळीमधे मीठ, हळद, हिरवी मिरची, आले, लसूण पेस्ट आणि पाणी टाकून चांगले बारीक करून घ्या.
- ह्या बारीक केलेल्या मिश्रणात कोथिंबीर आणि मेथी घालून चांगले एकजीव करा.
- एक नॉन स्टिक तवा गरम करा. त्यावर थोडे तेल सोडा आणि मग त्यावर १ डाव पीठ टाकून ते चांगले गोल पसरवा. त्यावर थोडी चटणी भूरभुरा आणि बाजूने थोडे तेल सोडा.
- हा डोसा जरा लालसर झाला की मग डिश मधे काढा. हा गरमागरम डोसा कोणत्याही चटणी, बटाटा भाजी किंवा सांबार बरोबर मस्त लागतो.

1 आपला प्रतिसाद (Comments):
व्वा! एकदम झक्कास आणि पौष्टीकही !!
Post a Comment