व्हेजिटेबल स्टिर फ्राय (Vegetable Stir Fry)



*** Vegetable Stir Fry ***

साहित्य:
  • उभे चिरलेले गाजरः १ कप
  • उभी चिरलेली फरसबीः १ कप
  • उभी चिरलेली ढबू मिरचीः १ कप
  • उभा कापलेला कोबीः १ कप
  • उभे कापलेली ब्रोकोलीची फुलेः १ कप
  • बारीक चिरलेले आलः १ टी स्पून
  • बारीक चिरलेला लसुणः २ टी स्पून
  • सोया सॉस: १ टेबल स्पून
  • चिली सॉस: चविनुसार
  • तेलः १ टेबल स्पून
  • चविनुसार मीठ

कृती:
  • एका नॉन स्टिक भांड्यामध्ये तेल गरम करा.
  • गरम झालेल्या तेलामध्ये आले आणि लसूण टाका. हे आले लसूण २ मिनिटे लालसर होईपर्यंत भाजा.
  • त्यात सगळ्या भाज्या एका पाठोपाठ एक टाका. ज्या भाजीला शिजायला जास्त वेळ लागतो ती भाजी आधी टाका. सगळ्या भाज्या नीट एकत्र करा.
  • नंतर त्यात सोय सॉस, चिली सॉस आणि मीठ टाकून सगळे नीट हलवा.
  • ह्या भाज्या झाकण लावून थोडा वेल शिजू द्याव्यात. ह्या भाज्या जास्त शिजवू नका त्या मग चांगल्या लागणार नाहीत.
  • हे गरमागरम व्हेजिटेबल स्टिर फ्राय तुम्ही पांढऱ्या भाताबरोबर किंवा तसेच खाऊ शकता.

No comments:

Post a Comment