थंडाई (भांग) - Almond Spices Milk



*** Thandai - Almond Spices Milk ***

साहित्य:
  • बदाम: १/२ कप
  • दुध: १ - १/२ कप
  • साखर: ४ टेबल स्पून
  • मिरे: १ टी स्पून
  • बडीशोप: १ टेबल स्पून
  • खसखस: २ टेबल स्पून
  • अक्खे वेलदोडे: ४
  • गुलाब पाणी: २ टेबल स्पून
  • गरजेनुसार पाणी

कृती:


  • सगळे बदाम भरपूर पाण्यात ५-६ तास भिजत ठेवा त्याचे साल काढून बाजूला ठेवा.
  • खसखस, वेलदोडे, मिरे, बडीशोप ची बारीक़ पुड करून घ्या.
  • एका ब्लेंडरमधे थोड़े पाणी घालून बदाम ची छान पेस्ट करून घ्या. नंतर मसाल्याची पुड दूध साखर टाकुन परत एकदा सगळे चांगले बारीक़ करून घ्या.
  • हे सगळे मिश्रण बारीक़ चाळनिमधुन गाळुन घ्या. उरलेला गाळ थोड़े पाणी टाकुन परत एकदा ब्लेंड करून आणि गाळुन घ्या.
  • त्यात गुलाबाचे पाणी टाकुन चांगले एकत्र करा.एका ग्लास मधे बर्फ टाका आणि त्यात थंडाई ओता.आता कशाची ही वाट न बघता ही थंडाई पियुन टाका. :)

माहितीचा स्त्रोत : सौ. मंजुला

7 comments:

  1. होळीच्या हार्दिक शुभेच्छा!!
    थंडाई छान दिसतेय गं :)

    ReplyDelete
  2. Thandai chi recipe chan aahe trupti!

    ReplyDelete
  3. This recipe is just like Manjula's recipe on youtube. Is it from there?

    ReplyDelete
  4. Thank you Vaidehi.

    Yes Anonymous, this recipe is from Manjula's Kitchen

    ReplyDelete
  5. english-marathi online dictionary (http://www.khandbahale.com/englishmarathi.php ) chi link dilyabaddal dhanyawad

    ReplyDelete
  6. tithech marathi-english suddha ahe. http://www.khandbahale.com/marathienglish.php

    ReplyDelete