गाजर सफरचंद सुप (Carrot Apple Soup)


Carrot Apple Soup

साहित्यः

 • २ मोठे गाजर
 • १ मध्यम आकाराचे सफरचंद
 • १ मध्यम आकाराचा कान्दा (कापलेला)
 • २ टेबल स्पून लोणी / तुप
 • १ टी स्पून बारीक किसलेले आले
 • गरजेपुरता वेजिटेबल स्टॉक / चिकन स्टॉक/ पाणी
 • चवीनुसार मीठ आणि मीरे पुड


कृती:

 • गाजर आणि सफरचंदाचे साल कढून घेऊन त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करा.
 • एका जाड बुडाच्या भांडयामध्ये लोणी गरम करायला ठेवा. लोणी गरम झाल्यावर त्यात कांदा टाका. हा कांदा लालसर होईपर्यंत भाजा.
 • नंतर त्यात कापलेले गाजर, सफरचंद, आले, मीठ, मीरे पुड, वेजिटेबल स्टॉक / चिकन स्टॉक/ पाणी घालून चांगले हलावा. ह्या मिश्रणालाचांगली उकळी आली की भांडयावर झाकण ठेवून मंद आचेवर थोडावेळ शीजू द्या. गाजर शिजले की भांडे बाजुला काढा.
 • हे मिश्रण मिक्सर मध्ये घालून चांगले बारिक करून घ्या. एक भांडयामध्ये हा सुप परत गरम करा. हा गरमागरम सुप कोणालाही कधीही प्यायला आवडेल.तृप्ती
Fashion Deals For Less

No comments:

Post a Comment