मेथी नाचणी सूप (Methi Ragi Soup)

Methi Ragi Soup

साहित्य:
 • एक टे. स्पून नाचणीचे पीठ
 • एक कप बारीक चिरलेली मेथी
 • थोडा बारीक किसलेला लसूण
 • प्रत्येकी एक टे. स्पून शेंगदाण्याचा कुट किंवा बदाम पूड आणि तूप
 • २-३ कप पाणी
 • एक टी स्पून ओवा
 • चवीपुरते मीठ, मिरे पूड
 • सजावटी साठी किसलेले खोबरे 

कृती :
 • सगळ्यात आधी एक कप पाण्यात नाचणीचे पीठ कालवून पातळ पेस्ट तयार करा. 
 • एका भांड्यामध्ये तूप गरम करून त्यात लसुणाची फोडणी करून ओवा, थोडे मीठ आणि मेथी टाका. मेथी थोडी हलवा आणि २-३ मिनिटे शिजू द्या. 
 • नंतर त्यात उरलेले पाणी, थोडे मीठ, मिरे पूड, शेंगदाण्याचा कुट किंवा बदाम पूड घाला. हा सूप गार झाला कि थोडा घट्ट होतो त्यामुळे पाणी जरा जास्तच घाला. 
 • पाणी चांगले उकळले कि त्यात नाचणीची पेस्ट टाकून थोड्या थोड्या वेळाने हलवत राहा. ४-५ मिनिटे सूप चांगला शिजू द्या. हा गरमागरम सूप बोल मध्ये काढून त्यावर खोबरे टाकून खायला द्या.


तृप्ती
Fashion Deals For Less


No comments:

Post a Comment