Baked Pakodas
साहित्य:
- पाऊन कप मैदा
- पाव कप बेसन
- पाव कप गव्हाचे पीठ
- प्रत्येकी १/३ कप लाल आणि हिरवी ढबू मिरची
- १/३ कप बारीक कापलेला कांदा
- अर्धा टी स्पून गरम मसाला
- २ टी स्पून तेल
- दीड टी स्पून बेकिंग सोडा
- अर्धा टी स्पून बेकिंग पावडर
- १/३ कप दही
- १/३ कप दुध
- पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर
- चवीनुसार मीठ आणि लाल मिरची पूड
कृती:
- ओवन २०० डिग्री सेल्सिअस वर गरम करायला ठेवा. बेकिंग शिट वर पार्चमेंत पेपर ठेवा.
- एका कढई मध्ये तेल गरम करा. त्यात कांदा, ढबू मिरची, गरम मसाला आणि थोडे मीठ टाकून थोडा वेळ शिजू द्या. ह्या भाज्या गार होण्यासाठी ठेवा.
- एका मिक्सिंग बोल मध्ये सगळी पीठे, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, लाल मिरची पूड, मीठ चाळून घ्या आणि मग त्यात शिजवलेली ढबू मिरची टाकून नीट मिक्स करा.
- नंतर त्यात दही आणि थोडे थोडे दुध टाकून त्या सगळ्याचा थोडा पातळ गोळा तयार करा.
- ह्या गोळ्याचे चमच्याने छोटे छोटे पकोडे बेकिंग शिट वर टाका. ह्या पकोड्यावर थोडे तेल ब्रश ने लावा किंवा कुकिंग ओईल स्प्रे करा.
- बेकिंग ट्रे ओवन मध्ये ठेऊन हे पकोडे सोनेरी रंग होईपर्यंत शिजू द्यावेत.
माहितीचा स्त्रोत - मधु
तृप्ती
Fashion Deals For Less
nice ...
ReplyDeleteThanks Vanamala
ReplyDelete