साहित्य :
- २ कप मैदा
- पाऊण कप बटर
- अर्धा कप साखर
- अर्धा कप थोडे बारीक केलेले बदाम
- पाव कप मनुके
- पाऊण कप दुध
- दोन टेबल स्पून दही
- चिमुटभर मीठ
कृती :
- ओवन २२५ डिग्री सेल्सिअस वर गरम करायला ठेवा.
- एका बेकिंग शीट ला थोडे बटर लाऊन थोडा मैदा भुरभुरून ठेवा.
- एका मोठ्या मिक्सिंग बोल मध्ये मैदा आणि मीठ चाळून घ्या. त्या मैद्यामध्ये थोडे पातळ केलेले बटर घालून हाताने मिक्स करा.
- नंतर त्यात बदाम, मनुके, साखर घालून नीट मिक्स करून घ्या.
- दुसऱ्या एका भांड्यामध्ये दुध आणि दही नीट मिक्स करून घ्या.
- हे मिश्रण मैद्याच्या मिश्रणात हळू हळू ओतून चांगले मिक्स करून त्याचा मऊ गोळा तयार करा. लागल्यास अजून थोडे दूध टाका.
- ह्या गोळ्याचे तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुकडे करा आणि बेकिंग शीट वरती ठेवा. हि बेकिंग शीट ओवन मध्ये ठेवा.
- स्कोनस फुगून तांबूस रंगाचे होईपर्यंत बेक करा. ह्याला साधारण २० -२५ मिनिटे लागतील. हे गरम गरम स्कोनस जाम किंवा जेली बरोबर खायला द्या.
तृप्ती
Fashion Deals For Less
No comments:
Post a Comment