पौष्टिक टोमॅटो कुलर (Healthy Tomato Cooler)
साहित्य

टोमॅटो: ३
साखर: १ टी स्पून
चाट मसाला: १/२ - १ टी स्पून
लिंबू: १
पाणी: १ वाटी
पुदीना: २-३ पाने
बर्फाचे तुकडे: ५-६
चवीनुसार मीठ

कृती
उकळत्या पाण्यात टोमॅटो ५-६ मिनेटे शिजवा. थोड्यावेळाने त्या टोमॅटो चे साल काढून पुदीना पाने घालून चांगले बारीक करून घ्या. वाटल्यास ते बारीक करताना थोडे पाणी घाला. मग हा रस गाळुन घ्या. रस गाळुन जो पल्प राहील तो कुठल्याही भाजित घाला आणि रस गार होण्यासाठी थोडावेळ फ्रीज़ मधे ठेवा. टोमॅटो चा रस चांगला गार झाल्यावर बाकीचे सगळे साहित्य चांगले एकत्र करून परत एकदा ब्लेण्ड करून घ्या आणि लगेच प्यायला द्या.

आता उन्हाळा आलाच आहे तेव्हा एखाद्या दुपारी हे कुलर तयार करायला काही हरकत नाही आणि ह्यात टोमॅटो असल्यामुळे हे पौष्टिक पण आहे.Healthy Tomato Cooler

Ingredients:
 • Tomato: 3
 • Sugar: 1 & 1/2 tsp
 • Pepper Powder: 2 Pinches
 • Chat Masala: 1/2 to 1 tsp
 • Lemon Juice: 1 tbsp (Optional)
 • Water: 1 Cup
 • Ice Cubes (Crushed): 5-6
 • Mint Leaves: 2-3
 • Salt to Taste
Procedure:
 1. Blanch tomatoes in boiling water for 5 minutes.
 2. Remove, peel and blend with mint leaves. Strain, cool and chill well. Use remaining pulp in any sabji.
 3. Just before serving, put all remaining ingredients in a mixie. Blend well and serve immediately.

No comments:

Post a Comment