काकडीचा वडा (Cucumber Vada)साहित्य:

 • जाडसर किसलेली मोठी काकडी: १
 • नाचणी चे पीठ: १/४ वाटी
 • तांदळाचे पीठ: १/४ वाटी
 • ज्वारीचे पीठ: १/४ वाटी
 • डाळीचे पीठ (बेसन): १ वाटी
 • बारीक चिरलेली कोथिंबीर: १/२ वाटी
 • बारीक चिरलेली हिरवी मिरची: २-३
 • हळद: १/२ टी स्पून
 • धणे पूड: १/२ टी स्पून
 • जीरे: १ टी स्पून
 • ओवा: १ टी स्पून
 • चवीनुसार मीठ
 • तळण्यासाठी तेल
कृती:
किसलेल्या काकडी मधे मीठ, जीरे, ओवा, धणे पूड, हळद, मिरची आणि कोथिंबीर टाकून चांगले हलवा. हे मिश्रण १० -१५ मिनिटे तसेच बाजूला ठेवा. मीठामुळे काकडी ला पाणी सुटेल. त्यात सगळी पीठे टाका आणि चांगले मिक्स करा. हवे असेल तर थोडे पाणी टाका. वडे हाताने थापायचे आहेत त्यामुळे हे मिश्रण जास्त पातळ करू नका. एका बाजूला एका कढई मधे तेल तापत ठेवा. काकडी च्या मिश्राणाचे लिंबू च्या आकराएव्हडे गोळे करा. एका प्लास्टिक च्या कागदावर हे वडे थापा. तेल गरम झाल्यावर हे वडे मध्यम आचेवर चांगले तळुन घ्या. हे गरमा गरम वडे कोणत्याही चटणी, दही किंवा साँस बरोबर खावा.


Multigrain Cucumber Vada

Ingredients:

 • Thick Grated Cucumber: 1
 • Ragi Flour: 1/4 Cup
 • Rice Flour: 1/4 Cup
 • Jawar Flour: 1/4 Cup
 • Besan (Chickpea Flour): 1 Cup
 • Finely Chopped Green Chillies: 2-3
 • Finely Chopped Coriander: 1/2 Cup
 • Turmeric Powder: 1/2 tsp
 • Coriander Powder: 1/2 tsp
 • Cumin Seeds: 1 tsp
 • Ajwain: 1 & 1/2 tsp
 • Salt to taste
 • Oil for Frying
Procedure:
 1. Add salt, all powders, cumin seeds, ajwain to grated cucumber. Mix very well. Keep this aside for 10 -15 minutes.
 2. Then add remaining ingredients to cucumber mixture. Add cucumber will leave water you may or may not need water to knead the dough.
 3. Make small lemon size balls of this dough.
 4. On a plastic sheet, shape vadas with these balls.
 5. Heat oil in the kadai and fry these vadas till it ger little bit red on medium heat.
 6. Serve these hot vadas with any sauce, ketch up, chutney or curd.

Source:
Anjali of Anna Parabrahma

1 comment:

 1. what a nice way of using cucumbers..love it..looks so nice..need to give this a try...yummmm

  ReplyDelete