- लहान दुधी: १
- कडीपत्ता: ५-६ पाने
- कांद्याचा मसाला: २ टी स्पून
- हिंग: २ चिमूटभर
- तेल: १ टेबल स्पून
- चवीनुसार मीठ
मसाल्याचे साहित्य:
- तुर डाळ: १ टेबल स्पून
- तिळ: १ टेबल स्पून
- धणे: १ टी स्पून
- किसलेले खोबरे: १ टेबल स्पून
- शेंगदाणे: १ टेबल स्पून
- आले लसूण पेस्ट: १ टी स्पून
कृती:
तुर डाळ, तिळ, धणे, खोबरे, शेंगदाणे लालसर होईपर्यंत भाजा. हे भाजलेले साहित्य थोडे गार होऊ द्या. नंतर मसाल्याचे सगळे साहित्य मिक्सर मधे पाणी घालून चांगले बारीक करा. ( मसाला बारीक होण्याइतकेच पाणी घाला. जास्त पाणी घालू नका.)
दुधी चे साल काढून बारीक तुकडे करा. एका कढई मधे तेल गरम करा. त्या तेलात कडीपत्ता आणि हिंग टाका. कडीपत्ता चांगला उडाला की त्यात बारीक केलेला मसाला टाका. हा मसाला चांगले तेल सुटेपर्यंत भाजा ( साधारण ५-६ मिनिटे लागतील). नंतर त्यात कांद्याचा मसाला टाकून १-२ मिनिटे चांगले शिजुन द्या. ह्या शीजलेल्या मसाल्यामधे दुधी चे तुकडे टाकून चांगले हलवा. १ मिनिटे झाल्यानंतर मीठ टाका आणि कढई वर झाकण ठेऊन भाजी २ मिनिटे शिजू द्या. दुधी जरा पारदर्शक झाली की जरा गरम पाणी टाकून भाजी चांगली शिजू द्या.
ह्या शीजलेल्या भाजीवर चिरलेली कोथिंबीर टाका. ही भाजी चपाती, फुलका, रोटी किंवा भाताबरोबर खायला द्या.
hey check out the blog for fun filled ''Festive Food' event
ReplyDeletehey Purva thanks for sharing this wonderful event.
ReplyDeletekandyacha masala mumbait kuthe milel?
ReplyDeleteAnonymous, Mumbai madhe kandyacha masala kuthe milato he mala mahit nahi sorry pan I think tumhala mumbai madhe ha masala nakki milel.
ReplyDeleteThank you very much for visiting the blog & keep visiting