मसाला वडा (Masala Vadaa)


*** Masala Vadaa (Read English Version Here) ***

साहित्य:

  • हरभरा डाळ : १ कप
  • दालचिनी : १
  • बारीक कापलेला कांदा : १/२ कप
  • बारीक चिरलिली कोथिंबीर: १/२ कप
  • बारीक चिरलेली मिरची : २-३
  • डाळीचे पीठ : १ टेबल स्पून
  • लाल मिरच्या : ३-४
  • चिरलेली कडीपत्ता पाने : ४-५
  • जीरे : १ टी स्पून
  • चवीपुरते मीठ
  • तळण्यासाठी तेल

कृती:

हरभरा डाळ चांगली धुवून भरपूर पाण्यात ४-५ तास भिजत ठेवा. नंतर हरभरा डाळ, दालचिनी, जीरे आणि लाल मिरची जाडसर बारीक करा. त्यात नंतर उरलेले साहित्या घालून चांगले मिक्स करा. ह्या मिश्रणा चे वडे वळतात का ते पहा. जर वडे वळत नसतील तर अजुन थोडे डाळीचे पीठ मिक्स करा. एका कढई मधे तेल गरम करायला ठेवा. डाळीच्या मिश्रणाचे छोटे छोटे चपटे वडे करा आणि तांबुस रंग होईपर्यंत तळा. हे गरमागरम वडे कोणत्याही चटणी किंवा सॉस बरोबर खावा.

5 comments:

  1. My mom makes this vada......and u reminded me of her....I wish I was in Mumbai right now..
    They look really yummy

    ReplyDelete
  2. Trupti,..
    khup divasat he vade khalle nahiyet... nakki karen ata

    ReplyDelete
  3. vaidehi..tu hey vade try keli ki mala nakki sang.

    ReplyDelete