
*** Bottle Gourd Raita -Click Here For English Version ***
साहित्य:
- किसलेला दुधी भोपळा: १ कप
- गार दही: २ कप
- बारीक चिरलेला कांदा: १ टेबल स्पून
- बारीक चिरलेली कोथिंबीर: १ टेबल स्पून
- बारीक चिरलेला टोमॅटो: १ टेबल स्पून
- जीरे पूड: १ टी स्पून
- चवीनुसार मीठ
कृती
किसलेला भोपळा पारदर्शक होईपर्यंत पाण्यात शिजवून घ्या. जास्त झालेले पाणी गाळुन काढून टाका आणि भोपळा थोडावेळ गार करायला ठेवा. तोपर्यंत दही चांगले फेटून घ्या. मग ह्या दह्यामधे सगळे साहित्य टाकून चांगले मिक्स करा. दही गार असल्यामुळे तुम्ही हा रायता लगेच खाऊ शकता किंवा १ तास फीज़ मधे ठेवा. हा गार रायता तुम्ही बिर्यानी किंवा भाजी - चपाती बरोबर खाऊ शकता.
No comments:
Post a Comment