गाजर हलवा ( Carrot Halwa)


*** English Version: Gajar Halwa ***

साहित्य:
  • किसलेले गाजर: २ कप
  • दुध: ३ कप
  • साखर: १/२ कप (चविनुसार)
  • वेलदोडा पुड: १/२ टी स्पून
  • तुप: २ टेबल स्पून
  • बारिक कापलेले काजु आणि बदाम: २ टेबल स्पून
  • बेदाणे : १ टेबल स्पून

कॄती:

  • गाजर किसायला घेताना एका जाड बुडाच्या भांड्यामधे दुध गरम करायला ठेवा. आपल्याला हे दुध जितके जास्त आटवता येईल तितके आटवायचे आहे. अधुनमधुन दुध हलवत रहा.
  • एका वाटीत दुध घेऊन त्यात काजु, बदाम, बेदाणे भिजायला ठेवा.
  • एका जाड बुडाच्या भांड्यामधे तुप गरम करा. ह्या तुपात किसलेले गाजर ४-५ मिनिटे भाजा.
  • गाजर थोडे शिजल्यावर त्यात आटवलेले दुध घाला. जोपर्यन्त सगळे दुध आटत नाही तोपर्यन्त हे गाजर शिजवा.
  • नंतर त्यात साखर, काजु, बदाम, बेदाणे, वेलदोडा पुड घाला आणि सगळे नीट मि़क्स करा. हा हलवा अजुन ४-५ मिनिटे शिजवा. झाला गाजराचा हलवा तयार.
  • हा हलवा तुम्ही गरम अथवा गार खाऊ शकता.

नोट:

  • जर तुमच्याकडे खवा असेल तर तुम्ही तो ह्या हलव्या मधे वापरु शकता. खवा वापरला तर दुध थोडेच वापरा. खवा वापरुन हा हलवा लवकर तयार होतो.

No comments:

Post a Comment