साहित्य:
- मैदा: २ कप
- लोणी: १ कप
- पीठीसाखर: ३/४ कप
- जाडसर कुटलेले बदाम: १ कप
- वनिल्ला इसेन्से: १ टी स्पून
- बेकिंग पावडर : १ टी स्पून
कॄती:
- एका मोठया मिक्सिंग बोल मधे लोणी, साखर, बेकिंग पावडर , वनिल्ला इसेन्से मिक्स करा.
- त्यात बदाम टाकुन सगळे नीट एकत्र करा. त्यात हळु हळु मैदा टाकुन सगळे साहित्य एकत्र करा. ह्या मिश्रणाचे गोळे होतील असे पीठ असले पाहीजे जर पीठ थोडे कोरडे असेल तर त्यात थोडे दूध टाका.
- एका बाजूला ओवन ३२५ डिग्री फेरन्हाइट वर गरम करायला ठेवा आणि दुसरी कडे २ कुकी शीट वर कुकिंग स्प्रे स्प्रे करा म्हणजे कुकीज शीट ला चीकटणार नाही.
- बदाम च्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करा किंवा एक मोठा गोळा करून त्याची जाड पोळी लाटा आणि कुकी कटर ने कुकी कापा. ह्या कुकीज कुकी शीट वर २ इंच अंतरावर ठेवा म्हणजे त्या बेक झाल्यावर एकमेकांना चिकटनार नाही.
- ह्या कुकीज गरम झालेल्या ओवन मधे २० -२५ मिनिटे बेक करा.
- ह्या कुकीज बेक झाल्यावर १०-१५ मिनिटे तशाच गार करायला ठेवा. ह्या कुकीज हवाबंद डब्यात ठेवा आणि जेव्हा पाहिजे तेव्हा खावा.
No comments:
Post a Comment