** Eggless French Toast: English Version **
साहित्य:
- ब्रेड स्लाइस : ४-५
- रवा: १/२ कप
- दही: १/२ कप
- बारीक चिरलेला कांदा: १/२ कप
- बारीक किसलेले गाजर: १/४ कप
- आले - हिरवी मिरचीची पेस्ट: चवीनुसार
- बारीक चिरलेली कोथिंबीर: गरजेनुसार
- चवीनुसार मीठ
- तेल
कृती:
- रवा, दही, कांदा, गाजर, आले- हिरवी मिरची पेस्ट, कोथिंबीर, मीठ हे सगळे साहित्य एका मोठ्या तोंडाच्या भांड्यात मिक्स करा. हे मिश्रण 5 मिनिटे तसेच ठेवा. 5 मिनिटे झाल्यावर हे मिश्रण जरा घट्ट होईल मग त्यात थोडे पाणी टाकून थोडे पातळ करा.
- ब्रेड तुमच्या आवडीच्या आकारानुसार कापा. जर तुमच्या कडे कुकी कटर असेल तर त्याचा उपयोग करा म्हणजे लहान मुले खुश होतील.
- एकीकडे एक नॉन स्टिक तवा गरम करायला ठेवा आणि तो तवा गरम झाल्यावर त्यावर थोडे तेल टाका. नंतर एक ब्रेड चा तुकडा तयार केलेल्या मिश्रणामधे चांगला बुडवा आणि गरम झालेल्या तव्यावर ठेवा. तव्यावर मावतील असे ब्रेड चे तुकडे ठेवा. प्रतेक तुकड्याच्या कडेने थोडे तेल सोडा. हे सगळे तुकडे दोनही बाजूने चांगले भाजा.
- हे तयार झालेले गरमागरम टोस्ट कुठल्याही सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर खायला द्या. मला खात्री आहे की हे नवीन प्रकारचे टोस्ट सगळ्याना आवडतील.
माहितीचा स्रोत: Coffee
मस्त आहे रेसिपी :) करून बघेन नक्की !!
ReplyDeletenakki karun bagh ani mala sang kase zale te
ReplyDelete