हिरव्या वाटाण्याचा सुप (Green Peas Soup)


**** Green Peas Soup: Click Here For English Version ****

साहित्यः
  • ताजे किंवा फ्रोजन हिरवे वाटाणेः २ कप
  • ताजे किंवा फ्रोजन कणसाचे दाणेः १ कप
  • नारळाचे दुधः १ कप
  • कापलेला कांदाः १ कप
  • कापलेले आले - लसुणः १/२ टेबल स्पून
  • लोणीः १ टेबल स्पून
  • वेजिटेबल स्टॉक किंवा चिकन स्टॉक किंवा पाणीः ३-४ कप
  • चविनुसार मीठ , लाल मिरची पुड, मीरे पुड

कृतीः
  • एका उभ्या भांड्यामध्ये लोणी गरम करा. त्यात कांदा आणि आले - लसुण टाकून कांदा पारदर्शक होइपर्यंत भाजा.
  • नंतर त्यात वाटाणा आणि कणसाचे दाणे टाकून चांगले मिसळून ३-४ मिनिटे शिजू द्या.
  • त्यात लाल मिरची पुड आणि मीरे पुड टाकून चांगले हलवा.
  • नंतर त्यात नारळाचे दुध, मीठ आणि वेजिटेबल स्टॉक किंवा चिकन स्टॉक किंवा पाणी टाका.
  • हे सगळे वाटाणा आणि कणसाचे दाणे चांगले माउ होइपर्यंत शिजवा.
  • नंतर भांडे बाजुला ठेउन मिश्रण थोडे गार होण्यासाठी ठेउन द्या.
  • थोड्यावेळाने हे मिश्रण ब्लेंडर मधून बारिक करून घ्या. हवे असल्यास अजून पाणी किंवा स्टॉक घाला.
  • एका बोल मध्ये हा सुप घालून त्यावर दही किंवा क्रिम ने सजावट करा. हा सुप तुम्ही गरमागरम अथवा गार पियू शकता.

3 comments:

  1. अच्छी ब्लॉग हे / और लेखनी बी बाड़िया हे / पड़कर बहुत खुश हुवा / मराठी मे टाइपिंग कर ने केलिए आप कौनसी टाइपिंग टूल यूज़ करते हे...?
    रीसेंट्ली मैने यूज़र फ्रेंड्ली इंडियन लणगौगे टाइपिंग टूल केलिए सर्च कर रहा ता तो मूज़े मिला.. " क्विलपॅड ". आप भी " क्विलपॅड 'www.quillpad.in यूज़ करते हे क्या...?

    ReplyDelete
  2. छान दिसतय ग सूप! वाटाणे आणि कणसाचे दाणे छान लागत असेल

    Vaidehi
    Marathi Recipes

    ReplyDelete
  3. aga tuzi site pahili sarv design tu keles ka.. kharach khupach chan..ani mazya best wishes tuzyasathi ahetach :) keep it up !!

    Vaidehi
    Marathi Recipes

    ReplyDelete