*** Rajma Curry English Version ***
साहित्य:
- राजमा :२कप
- बारीक चिरलेला कांदाः १ कप
- बारीक चिरलेला टोमॅटो: २ कप
- आले - लसुण पेस्टः २ टी स्पून
- बारीक चिरलेली हिरवी मिरचीः ३-४
- लाल मिरची पुडः चवीनुसार
- धणे पुडः २ टी स्पून
- जीरे पुडः १ टी स्पून
- आमचुर पावडरः १ टी स्पून
- बारिक चिरलेली कोथिंबीर: १ टेबल स्पून
- खोवलेले ताजे खोबरेः १ टेबल स्पून
- तेलः १ टेबल स्पून
- चवीनुसार मीठ
कृती:
- राजमा भरपुर पाण्यात ७-८ तास भिजत ठेवा. हा राजमा कुकर मध्ये ३-४ शिट्या होईपर्यंत शिजवा. राजमा शिजवताना त्यात थोडे मीठ टाका.
- एका भांड्यामध्ये तेल गरम करा. त्यात हिरवी मिरची टाकुन चांगली भाजू द्या. नंतर त्यात आले लसूण पेस्ट टाकून मिनिट भर चांगले परतू द्या.
- नंतर कांदा टाकून चांगला तांबुस होईपर्यंत भाजा. नंतर टोमॅटो टाकून ३-४ मिनिटे चांगले शिजू द्या.
- नंतर सगळे मसाले टाका आणि हा मसाला चांगला एकत्र करून २-३ मिनिटे भाजू द्या.
- नंतर शिजवलेला राजमा, मीठ आणि गरजे पुरते पाणी टाका. हा राजमा चांगला उकळी येईपर्यंत शिजू द्या.
- हा राजमा एका वाटीमध्ये किंवा सर्विंग बोल मध्ये काढा. त्यावर कोथिंबीर आणि खोबरे भुरभुरा.हा गरमागरम राजमा चपाती किंवा भाताबरोबर छान लागेल.
छान आहे रेसिपी..ताजे खोबरे घालून मी केला नाही कधी..आता बघेन!
ReplyDeleteThank you Vaidehi. Try karun bagh ani mag mala san
ReplyDeletethanka 4 recipi
ReplyDeleteराजमा .......एकच नंबर लागली न करी ...!!
ReplyDelete