बिना अंड्याचे केळीचे मफिन्स (Eggless Banana Muffins)


***Eggless Banana Muffins***
साहित्य: ( ६ मफिन्स साठी)

 • मैदा : १ कप
 • साखर: ३/४ कप
 • बेकिंग पावडर: १/२ टी स्पून
 • बेकिंग सोडा: १ टी स्पून
 • दूध: १/४ कप
 • कुस्करलेले केळ: १
 • बदामाचे काप: १/४ कप
 • तेल: १/४ कप
 • चिमूटभर मीठ
कृती:
 • ओवन ४०० डिग्री फेरन्हाइट वर गरम करा. मफिन पॅन मधे मफिन चे प्लास्टिक चे कप ठेवा.
 • एका मोठ्या भांड्यामधे मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मीठ, साखर नीट मिक्स करा.
 • दुसर्‍या एका कप मधे दूध आणि तेल मिक्स करा आणि हे तेल - दूध आधी तयार केलेल्या कोरड्या मैद्याच्या मिश्रणामधे टाकून नीट मिक्स करा.
 • त्यात बदाम आणि केळ टाकून परत नीट मिक्स करा.
 • हे मिश्रण मफिन कप ३/४ भरतील असे ओता.
 • हा मफिन पॅन ओवन मधे २०-२५ मिनिटे ठेवून (तांबुसरंग होईपर्यंत) बेक करा.
 • हे मफिन्स तयार झाल्यावर १५-२० मिनिटे गार होण्यासाठी ठेवा.
 • हे मफिन्स तुम्ही तसेच खाऊ शकता किंवा तुम्हाला आवडते ते आइस क्रीम/ विप्पिंग क्रीम मफिन वर पसरवून खाऊ शकता.

तृप्ती
Fashion Deals For Less

3 comments:

 1. मराठी ब्लॉगर्सचा पहिलावहिला ब्लॉगकॅम्प सिंहगड रोडवरील पु. ल. देशपांडे उद्यानात मोठ्या उत्साहात झाला, १६  जानेवारी १० ला त्याबद्दल सर्व मराठी ब्लॉगेर्सचे अभिनंदन :-) महेश

  ReplyDelete
 2. I want to save the recipes, however, after downloading I am unable to read the same. Because I have no Mangal font. Will you please send the font? Waiting eagerly. My email address : shaikh_innus@rediffmail.com

  ReplyDelete