
**** Rice Dhokla ****
साहित्य:
- तांदुळ: १ कप
- उडीद डाळ: १/४ कप
- दही: १ कप
- इनो: १ टी स्पून
- चविनुसार साखर, मीठ, मीरे पूड
फोडणीसाठी:
- तेल: २ टेबल स्पून
- मोहरी: २ टी स्पून
- चिमटभर हिंग
- तांदूळ आणि डाळ वेगवेगळ्या भांड्यामधे भरपूर पाण्यात ४-५ तास भिजत ठेवा.
- नंतर तांदूळ आणि डाळ मिक्सर मधे चांगले बारीक करून घ्या. हे मिश्रण ४-५ तास गरम जागेत ठेवा. हे मिश्रण इडली पीठासारखे आंबू देऊ नये.
- नंतर त्या पीठात दही, मीठ, साखर, मीरे पूड आणि थोडे पाणी टाकून चांगले हलवुन घ्या. हे पीठ इडली च्या पीठासारखे पातळ असु द्या.
- नंतर ढोकळा करायच्या ताटली मधे किंवा पसरट कुकर च्या भांड्याला तेल लावा. पीठात इनो घालून पीठ चांगले ढवळून घ्या आणि लगेच ताटली मधे ताटली ३/४ भरेल इतपत ओता.
- स्टीमर मधे किंवा एका मोठ्या भांड्या मधे पाणी ओतून ताटली किंवा कुकर चे भांडे त्यावर ठेवा आणि १०-१५ मिनिटे शिजू द्या. नंतर त्यात सुरी घालून बघा. ही सुरी बाहेर काढली की त्याला ढोकळ्याचे कण लागता कामा नये.
- हा ढोकळा थोडावेळ गार होऊ द्या. त्याचे छोटे छोटे तुकडे करा आणि मग ती ताटली उलटी करून ते तुकडे डिश मधे ठेवा.
- नंतर तेलात मोहरी,हिंग ची फोडणी करून त्या ढोकळ्यावर ही फोडणी टाका.
- हा मस्त ढोकळा हिरव्या चटणी बरोबर किंवा चिंचेच्या चटणी बरोबर खायला द्या.
Fashion Deals For Less


0 आपला प्रतिसाद (Comments):
Post a Comment