ब्रोकोली उपमा (Broccoli Upama)


Broccoli Upama

साहित्य:
  • दोन कप फूड प्रोसेसर मध्ये एकदम बारीक केलेली ब्रोकोली
  • दोन उकडलेली अंडी
  • पाव कप दलिया
  • अर्धा कप बारीक चिरलेला कांदा
  • पाच - सहा बारीक कापलेल्या मिरच्या
  • एक टी स्पून बारीक किसलेले आले
  • १ टी स्पून मोहरी आणि जिरे
  • दोन टेबल स्पून तेल
  • गरजेनुसार मीठ, जिरे पूड, धने पूड

कृती:

  • सगळ्यात आधी एका भांड्यात दलिया शिजायला ठेवा.
  • उकडलेल्या अंड्याचा पांढरा भागाचे बारीक तुकडे करा.
  • एका भांड्यामध्ये तेल गरम करून त्यात जिरे मोहरीची फोडणी करून मिरच्या परतून घ्या.
  • त्यात कापलेला कांदा आणि आले घालून ते लालसर होईपर्यंत भाजा.
  • नंतर त्यात ब्रोकोली, थोडे मीठ टाकून चांगले मिक्स करून झाकून ३-४ मिनिटे शिजू द्या.
  • नंतर त्यात शिजलेला दलिया, कापलेली अंडी. मीठ, धने - जिरे पूड टाकून मिक्स करून अजून ५-६ मिनिटे शिजू द्या. झाला तुमचा पौष्टिक ब्रोकोली उपमा तयार. तुम्ही हा उपमा पार्टी साठी पण करू शकता. त्यासाठी उकडलेली अंडी अर्धी कापून घ्या. त्यातला पिवळा बलक काढून त्यात उपमा घाला.त्यावर थोडा सॉस घालून प्लेट मध्ये घालून खायला द्या.


तृप्ती
Fashion Deals For Less






No comments:

Post a Comment