कारल्याची भजी (Karela or Bitter Gourd Fritters)

Karela Fritters


ही रेसिपी इंग्लीश मधून वाचण्यासाठी इथे टिचकी मारा.
साहित्य
कार्ले: १
नाचणी पीठ: १ वाटी
हिंग: चिमूटभर
लाल मिरची पूड: १ टी स्पून
आमचूर पूड: १/२ टी स्पून
सोडा: चिमूटभर
चवीनुसार मीठ
१ लिंबाचा रस
पाणी
तेल

कृती

कार्ले चांगले धुवून घेऊन त्याच्या पातळ गोल चकत्या कापा. ह्या चकत्यांना लिंबाचा रस आणि थोडे मीठ लाऊन १५- २० मिनिटे ठेवा. नंतर ह्या चकत्या पाण्याने २-३ वेळा नीट धुवा.

एका कढई मधे तेल तापवायला ठेवा. तेल तापुपर्यंत नाचणीच्या पीठात हिंग, लाल मिरची पूड, सोडा, मीठ, आमचूर पूड, पाणी टाकून भजीचे पीठ तयार करा. तेल गरम झाले की त्यात कार्ल्याचे काप बुडवून भजी तेलात सोडाव्यात. ही भजी दोन्ही बाजुंनी २-३ मिनिटे चांगली तळा.

ही गरमागरम भजी कोणत्याही पातळ चटणी बरोबर किंवा साँस बरोबर खावा.

ही भजी डायबेटिस असलेल्या लोकांना छान आहे.

4 comments:

  1. रुचिरा..
    ब्लॉगला भेट देऊन प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल धन्यवाद..तुझा/तुमचा ब्लॉग बघितला आणि डोळे तृप्त झाले कारण...स्वयंपाकामधला ओ की ठो येत नसला तरी मी हाडाची खवय्यी आहे...त्यामुळे your blog was a real treat for me...
    श्रद्धा..’शब्द-पट’ वाली...

    ReplyDelete
  2. आपला ब्लॉग फ़ारच चविष्ट आहे हो. मला फ़ार आवडला. तसेच ब्लॉगचे टेम्प्लेटसुध्दा खूप छान आहे.

    ReplyDelete
  3. Very innovative recipe, Ruchira! Must try it sometime.

    But I must point out that although bitter gourd is good for diabetic patients, deep fried foods are a big no-no. Deep frying would do more damage than what good the karela would do.

    ReplyDelete
  4. Thanks Shradha, Morpees, Priya.

    Priya,
    Deep fried food is always no - no for anyone but some times it's ok right?

    ReplyDelete