तांदळाचा ढोकळा (Rice Dhokla)


**** Rice Dhokla ****


साहित्य:

  • तांदुळ: १ कप

  • उडीद डाळ: १/४ कप

  • दही: १ कप

  • इनो: १ टी स्पून

  • चविनुसार साखर, मीठ, मीरे पूड

फोडणीसाठी:

  • तेल: २ टेबल स्पून

  • मोहरी: २ टी स्पून

  • चिमटभर हिंग

कृती:


  • तांदूळ आणि डाळ वेगवेगळ्या भांड्यामधे भरपूर पाण्यात - तास भिजत ठेवा.

  • नंतर तांदूळ आणि डाळ मिक्सर मधे चांगले बारीक करून घ्या. हे मिश्रण - तास गरम जागेत ठेवा. हे मिश्रण इडली पीठासारखे आंबू देऊ नये.

  • नंतर त्या पीठात दही, मीठ, साखर, मीरे पूड आणि थोडे पाणी टाकून चांगले हलवुन घ्या. हे पीठ इडली च्या पीठासारखे पातळ असु द्या.

  • नंतर ढोकळा करायच्या ताटली मधे किंवा पसरट कुकर च्या भांड्याला तेल लावा. पीठात इनो घालून पीठ चांगले ढवळून घ्या आणि लगेच ताटली मधे ताटली / भरेल इतपत ओता.

  • स्टीमर मधे किंवा एका मोठ्या भांड्या मधे पाणी ओतून ताटली किंवा कुकर चे भांडे त्यावर ठेवा आणि १०-१५ मिनिटे शिजू द्या. नंतर त्यात सुरी घालून बघा. ही सुरी बाहेर काढली की त्याला ढोकळ्याचे कण लागता कामा नये.

  • हा ढोकळा थोडावेळ गार होऊ द्या. त्याचे छोटे छोटे तुकडे करा आणि मग ती ताटली उलटी करून ते तुकडे डिश मधे ठेवा.

  • नंतर तेलात मोहरी,हिंग ची फोडणी करून त्या ढोकळ्यावर ही फोडणी टाका.

  • हा मस्त ढोकळा हिरव्या चटणी बरोबर किंवा चिंचेच्या चटणी बरोबर खायला द्या.


तृप्ती
Fashion Deals For Less

3 comments:

  1. Chan recipe aahe Tandulacha dhokala. Rice and urid dal bhijavali ki vatatana pani kadhun takaycha ka sagala pani use karaycha?

    ReplyDelete
  2. Thanks Vrushali. Aapan idli sathi jase rice & udid dal barik karato tasech dhoklyasathi pan karayche. Peeth jast patal pan nako ani jaast ghatt pan nako.

    ReplyDelete
  3. hey...thanks..mi karun baghitla tandul dhokla ani tyachah pizza banwun baghitla...best jamla..my kids were so happy for this recipe. plz add some new also....swarada :-)

    ReplyDelete