
***Eggless Banana Muffins***
साहित्य: ( ६ मफिन्स साठी)
- मैदा : १ कप
- साखर: ३/४ कप
- बेकिंग पावडर: १/२ टी स्पून
- बेकिंग सोडा: १ टी स्पून
- दूध: १/४ कप
- कुस्करलेले केळ: १
- बदामाचे काप: १/४ कप
- तेल: १/४ कप
- चिमूटभर मीठ
- ओवन ४०० डिग्री फेरन्हाइट वर गरम करा. मफिन पॅन मधे मफिन चे प्लास्टिक चे कप ठेवा.
- एका मोठ्या भांड्यामधे मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मीठ, साखर नीट मिक्स करा.
- दुसर्या एका कप मधे दूध आणि तेल मिक्स करा आणि हे तेल - दूध आधी तयार केलेल्या कोरड्या मैद्याच्या मिश्रणामधे टाकून नीट मिक्स करा.
- त्यात बदाम आणि केळ टाकून परत नीट मिक्स करा.
- हे मिश्रण मफिन कप ३/४ भरतील असे ओता.
- हा मफिन पॅन ओवन मधे २०-२५ मिनिटे ठेवून (तांबुसरंग होईपर्यंत) बेक करा.
- हे मफिन्स तयार झाल्यावर १५-२० मिनिटे गार होण्यासाठी ठेवा.
- हे मफिन्स तुम्ही तसेच खाऊ शकता किंवा तुम्हाला आवडते ते आइस क्रीम/ विप्पिंग क्रीम मफिन वर पसरवून खाऊ शकता.
तृप्ती
Fashion Deals For Less