Showing posts with label लहान मुलांचा खाऊ. Show all posts
Showing posts with label लहान मुलांचा खाऊ. Show all posts

सोयाबीन कटलेट (Soyabean Cutlets)






साहित्य : 
  • अर्धा कप सोया ग्रनुअल्स
  • अर्धा कप उकडलेले मुग
  • एक उकडलेला बटाटा
  • पाव कप बारीक चिरलेला कांदा
  • एक टी स्पून गरम मसाला
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • चवीनुसार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि मीठ
  • थोडा रवा
  • तेल 

कृती :


  • सोया ग्रनुअल्स शिजवून घेऊन त्यातले पाणी काढून टाका. बटाटा चांगला मॅश करून घ्या. 
  • एका पसरट भांड्यामध्ये सोया ग्रनुअल्स, मुग, बटाटा, कांदा, गरम मसाला, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि मीठ टाकून चांगले मिक्स करून घ्या. 
  • एका बाजूला नॉन स्टिक तवा गरम करायला ठेवा. तयार केलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून दाबून त्यांना कटलेट चा आकार द्या.
  • एका प्लेट मध्ये रवा पसरवा. त्या रव्यावर कटलेट ठेवून कटलेट दाबा म्हणजे रवा कटलेट ला चांगला लागेल. हा रवा कटलेट च्या दोनही बाजूना लावा. 
  • गरम झालेल्या तव्यावर तेल टाकून हे कटलेट त्यावर दोनही बाजूने तांबूस होईपर्यंत भाजा. 
  • हे गरमागरम कट्लेट कुठल्याही सॉस किंवा चटणी बरोबर खायला द्या.  

तृप्ती

बेक्ड पकोडे (Baked Pakoda)


Baked Pakodas

साहित्य: 

  • पाऊन कप मैदा
  • पाव  कप बेसन 
  • पाव कप गव्हाचे पीठ
  • प्रत्येकी १/३ कप लाल आणि हिरवी ढबू मिरची
  • १/३ कप बारीक कापलेला कांदा
  • अर्धा टी स्पून गरम मसाला
  • २ टी स्पून तेल
  • दीड टी स्पून बेकिंग सोडा
  • अर्धा टी स्पून बेकिंग पावडर
  • १/३ कप दही
  • १/३ कप दुध
  • पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर
  • चवीनुसार मीठ आणि लाल मिरची पूड


कृती: 

  • ओवन २०० डिग्री सेल्सिअस वर गरम करायला ठेवा. बेकिंग शिट वर पार्चमेंत पेपर ठेवा. 
  • एका कढई मध्ये तेल गरम करा. त्यात कांदा, ढबू मिरची, गरम मसाला आणि थोडे मीठ टाकून थोडा वेळ शिजू द्या. ह्या भाज्या गार होण्यासाठी ठेवा.
  • एका मिक्सिंग बोल मध्ये सगळी पीठे, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, लाल मिरची पूड, मीठ चाळून घ्या आणि मग त्यात शिजवलेली ढबू मिरची टाकून नीट मिक्स करा.
  • नंतर त्यात दही आणि थोडे थोडे दुध टाकून त्या सगळ्याचा थोडा पातळ गोळा तयार करा. 
  • ह्या गोळ्याचे चमच्याने छोटे छोटे पकोडे बेकिंग शिट वर टाका. ह्या पकोड्यावर थोडे तेल ब्रश ने लावा किंवा कुकिंग ओईल स्प्रे करा. 
  • बेकिंग ट्रे ओवन मध्ये ठेऊन हे पकोडे सोनेरी रंग होईपर्यंत शिजू द्यावेत.


माहितीचा स्त्रोत - मधु


तृप्ती
Fashion Deals For Less






स्कोनस (Scones)








साहित्य : 
  • २ कप मैदा
  • पाऊण कप बटर
  • अर्धा कप साखर
  • अर्धा कप थोडे बारीक केलेले बदाम
  • पाव कप मनुके
  • पाऊण कप दुध
  • दोन टेबल स्पून दही
  • चिमुटभर मीठ 

कृती : 
  • ओवन २२५ डिग्री सेल्सिअस वर गरम करायला ठेवा. 
  • एका बेकिंग शीट ला थोडे बटर लाऊन थोडा मैदा भुरभुरून ठेवा. 
  • एका मोठ्या मिक्सिंग बोल मध्ये मैदा आणि मीठ चाळून घ्या. त्या मैद्यामध्ये थोडे पातळ केलेले बटर घालून हाताने मिक्स करा.
  • नंतर त्यात बदाम, मनुके, साखर घालून नीट मिक्स करून घ्या.
  • दुसऱ्या एका भांड्यामध्ये दुध आणि दही नीट मिक्स करून घ्या. 
  • हे मिश्रण मैद्याच्या मिश्रणात हळू हळू ओतून चांगले मिक्स करून त्याचा मऊ गोळा तयार करा. लागल्यास अजून थोडे दूध टाका.
  • ह्या गोळ्याचे तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुकडे करा आणि बेकिंग शीट वरती ठेवा. हि बेकिंग शीट ओवन मध्ये ठेवा. 
  • स्कोनस फुगून तांबूस रंगाचे होईपर्यंत बेक करा. ह्याला साधारण २० -२५ मिनिटे लागतील. हे गरम गरम स्कोनस जाम किंवा जेली बरोबर खायला द्या.



तृप्ती
Fashion Deals For Less







ब्रोकोली उपमा (Broccoli Upama)


Broccoli Upama

साहित्य:
  • दोन कप फूड प्रोसेसर मध्ये एकदम बारीक केलेली ब्रोकोली
  • दोन उकडलेली अंडी
  • पाव कप दलिया
  • अर्धा कप बारीक चिरलेला कांदा
  • पाच - सहा बारीक कापलेल्या मिरच्या
  • एक टी स्पून बारीक किसलेले आले
  • १ टी स्पून मोहरी आणि जिरे
  • दोन टेबल स्पून तेल
  • गरजेनुसार मीठ, जिरे पूड, धने पूड

कृती:

  • सगळ्यात आधी एका भांड्यात दलिया शिजायला ठेवा.
  • उकडलेल्या अंड्याचा पांढरा भागाचे बारीक तुकडे करा.
  • एका भांड्यामध्ये तेल गरम करून त्यात जिरे मोहरीची फोडणी करून मिरच्या परतून घ्या.
  • त्यात कापलेला कांदा आणि आले घालून ते लालसर होईपर्यंत भाजा.
  • नंतर त्यात ब्रोकोली, थोडे मीठ टाकून चांगले मिक्स करून झाकून ३-४ मिनिटे शिजू द्या.
  • नंतर त्यात शिजलेला दलिया, कापलेली अंडी. मीठ, धने - जिरे पूड टाकून मिक्स करून अजून ५-६ मिनिटे शिजू द्या. झाला तुमचा पौष्टिक ब्रोकोली उपमा तयार. तुम्ही हा उपमा पार्टी साठी पण करू शकता. त्यासाठी उकडलेली अंडी अर्धी कापून घ्या. त्यातला पिवळा बलक काढून त्यात उपमा घाला.त्यावर थोडा सॉस घालून प्लेट मध्ये घालून खायला द्या.


तृप्ती
Fashion Deals For Less






गाजर सफरचंद सुप (Carrot Apple Soup)


Carrot Apple Soup

साहित्यः

  • २ मोठे गाजर
  • १ मध्यम आकाराचे सफरचंद
  • १ मध्यम आकाराचा कान्दा (कापलेला)
  • २ टेबल स्पून लोणी / तुप
  • १ टी स्पून बारीक किसलेले आले
  • गरजेपुरता वेजिटेबल स्टॉक / चिकन स्टॉक/ पाणी
  • चवीनुसार मीठ आणि मीरे पुड


कृती:

  • गाजर आणि सफरचंदाचे साल कढून घेऊन त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करा.
  • एका जाड बुडाच्या भांडयामध्ये लोणी गरम करायला ठेवा. लोणी गरम झाल्यावर त्यात कांदा टाका. हा कांदा लालसर होईपर्यंत भाजा.
  • नंतर त्यात कापलेले गाजर, सफरचंद, आले, मीठ, मीरे पुड, वेजिटेबल स्टॉक / चिकन स्टॉक/ पाणी घालून चांगले हलावा. ह्या मिश्रणालाचांगली उकळी आली की भांडयावर झाकण ठेवून मंद आचेवर थोडावेळ शीजू द्या. गाजर शिजले की भांडे बाजुला काढा.
  • हे मिश्रण मिक्सर मध्ये घालून चांगले बारिक करून घ्या. एक भांडयामध्ये हा सुप परत गरम करा. हा गरमागरम सुप कोणालाही कधीही प्यायला आवडेल.



तृप्ती
Fashion Deals For Less





काकडीचा डोसा (Cucumber Dosa)








साहित्यः
  • १ कप गव्हाचे पीठ
  • १/४ कप तांदळाचे पीठ
  • १/४ कप बारिक रवा
  • २ कप कापलेली काकडी
  • चविनुसार हिरव्या मिरच्या, मीठ
  • थोडे तेल

कृती:
  • मिक्सरमध्ये काकडी, मीठ आणि मिरची घालून चांगली पेस्ट तयार करून घ्या.
  • नंतर ह्या पेस्ट मध्ये गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ,रवा आणिगरजेपुरते पाणी घालून चांगले हलून घ्या.
  • ह्या पीठाचे नेहमीच्या डोस्यासारखे डोसे तयार करा.
  • हे गरमागरम डोसे कोणत्याही चटणी,सॉस किन्वा बटाट्याच्या भाजी बरोबर खाता येतील.

तृप्ती
Fashion Deals For Less





बिना अंड्याचे केळीचे मफिन्स (Eggless Banana Muffins)


***Eggless Banana Muffins***
साहित्य: ( ६ मफिन्स साठी)

  • मैदा : १ कप
  • साखर: ३/४ कप
  • बेकिंग पावडर: १/२ टी स्पून
  • बेकिंग सोडा: १ टी स्पून
  • दूध: १/४ कप
  • कुस्करलेले केळ: १
  • बदामाचे काप: १/४ कप
  • तेल: १/४ कप
  • चिमूटभर मीठ
कृती:
  • ओवन ४०० डिग्री फेरन्हाइट वर गरम करा. मफिन पॅन मधे मफिन चे प्लास्टिक चे कप ठेवा.
  • एका मोठ्या भांड्यामधे मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मीठ, साखर नीट मिक्स करा.
  • दुसर्‍या एका कप मधे दूध आणि तेल मिक्स करा आणि हे तेल - दूध आधी तयार केलेल्या कोरड्या मैद्याच्या मिश्रणामधे टाकून नीट मिक्स करा.
  • त्यात बदाम आणि केळ टाकून परत नीट मिक्स करा.
  • हे मिश्रण मफिन कप ३/४ भरतील असे ओता.
  • हा मफिन पॅन ओवन मधे २०-२५ मिनिटे ठेवून (तांबुसरंग होईपर्यंत) बेक करा.
  • हे मफिन्स तयार झाल्यावर १५-२० मिनिटे गार होण्यासाठी ठेवा.
  • हे मफिन्स तुम्ही तसेच खाऊ शकता किंवा तुम्हाला आवडते ते आइस क्रीम/ विप्पिंग क्रीम मफिन वर पसरवून खाऊ शकता.

तृप्ती
Fashion Deals For Less

तांदळाचा ढोकळा (Rice Dhokla)


**** Rice Dhokla ****


साहित्य:

  • तांदुळ: १ कप

  • उडीद डाळ: १/४ कप

  • दही: १ कप

  • इनो: १ टी स्पून

  • चविनुसार साखर, मीठ, मीरे पूड

फोडणीसाठी:

  • तेल: २ टेबल स्पून

  • मोहरी: २ टी स्पून

  • चिमटभर हिंग

कृती:


  • तांदूळ आणि डाळ वेगवेगळ्या भांड्यामधे भरपूर पाण्यात ४-५ तास भिजत ठेवा.

  • नंतर तांदूळ आणि डाळ मिक्सर मधे चांगले बारीक करून घ्या. हे मिश्रण ४-५ तास गरम जागेत ठेवा. हे मिश्रण इडली पीठासारखे आंबू देऊ नये.

  • नंतर त्या पीठात दही, मीठ, साखर, मीरे पूड आणि थोडे पाणी टाकून चांगले हलवुन घ्या. हे पीठ इडली च्या पीठासारखे पातळ असु द्या.

  • नंतर ढोकळा करायच्या ताटली मधे किंवा पसरट कुकर च्या भांड्याला तेल लावा. पीठात इनो घालून पीठ चांगले ढवळून घ्या आणि लगेच ताटली मधे ताटली ३/४ भरेल इतपत ओता.

  • स्टीमर मधे किंवा एका मोठ्या भांड्या मधे पाणी ओतून ताटली किंवा कुकर चे भांडे त्यावर ठेवा आणि १०-१५ मिनिटे शिजू द्या. नंतर त्यात सुरी घालून बघा. ही सुरी बाहेर काढली की त्याला ढोकळ्याचे कण लागता कामा नये.

  • हा ढोकळा थोडावेळ गार होऊ द्या. त्याचे छोटे छोटे तुकडे करा आणि मग ती ताटली उलटी करून ते तुकडे डिश मधे ठेवा.

  • नंतर तेलात मोहरी,हिंग ची फोडणी करून त्या ढोकळ्यावर ही फोडणी टाका.

  • हा मस्त ढोकळा हिरव्या चटणी बरोबर किंवा चिंचेच्या चटणी बरोबर खायला द्या.


तृप्ती
Fashion Deals For Less

छोले कटलेट (Chickpea Cutlets)


*** Chickpea Cutlets: English Version ***

साहित्य:
  • भिजवून उकडलेले छोले: १ कप
  • उकडलेला बटाटा / रताळे: १ लहान
  • ब्रेड क्रमस : १/२ कप
  • बारीक़ किसलेले गाजर : १/२ कप
  • बारीक़ कापलेला कांदा: १/२ कप
  • वाटलेले आले, लसूण आणि हिरवी मिरची: चवीनुसार
  • जीरे पुड: १ टी स्पून
  • धने पुड : १ टी स्पून
  • हळद: २ चिमुट
  • लिंबाचा रस : १ टेबल स्पून
  • चवीनुसार मीठ
  • तेल

कृती:

  • कांदा, गाजर आणि मीठ एकत्र करून ५ मिनिटे बाजूला ठेवा.
  • छोले आणि बटाटा / रताळे चांगले कुसकरून एकत्र करा. नंतर त्यात कांद्याचे मिश्रण आणि तेल सोडून बाकीचे सगळे साहित्य टाकुन चांगले मळून घ्या.
  • ह्या मिश्रणाच्या छोटे छोटे चपटे तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे कट्लेट तयार करा.
  • एक नॉन स्टिक पॅन गरम करा त्यामधे थोडे तेल टाका। पॅन मधे कट्लेट नीट ठेवा आणि थोडे तेल प्रत्येक कट्लेट च्या बाजूने थोडे तेल सोडा. हे कट्लेट दोन्ही बाजूने थोडे तांबुस होईपर्यंत भाजा.
  • हे गरमागरम कट्लेट कुठल्याही सॉस किंवा चटणी बरोबर खायला द्या. तुम्ही हे कट्लेट बर्गर मधे पण वापरु शकता.

फ्रेंच टोस्ट (Savory French Toast)



*** Savory French Toast: Click Here for English Version ***

साहित्य:
  • अंडी: २
  • ब्रेडः ४-५
  • बारिक चिरलेला कांदा: २ टेबल स्पून
  • बारिक चिरलेली कोथिंबीर: १ टेबल स्पून
  • चवीनुसार लाल मिरची पुड
  • चवीनुसार मीठ
  • तेल

कृती:

  • मोठ्या तोंडाच्या एका बोल मध्ये अंडी, कांदा, कोथिंबीर, लाल मिरची पुड, मीठ नीट मिक्स करा.
  • ब्रेड तुमच्या आवडीच्या आकारानुसार कापा. जर तुमच्या कडे कुकी कटर असेल तर त्याचा उपयोग करा म्हणजे लहान मुले खुश होतील.
  • एकीकडे एक नॉन स्टिक तवा गरम करायला ठेवा आणि तो तवा गरम झाल्यावर त्यावर थोडे तेल टाका. नंतर एक ब्रेड चा तुकडा तयार केलेल्या मिश्रणामध्ये चांगला बुडवा आणि गरम झालेल्या तव्यावर ठेवा. तव्यावर मावतील असे ब्रेड चे तुकडे ठेवा. प्रतेक तुकड्याच्या कडेने थोडे तेल सोडा. हे सगळे तुकडे दोनही बाजूने चांगले भाजा.
  • हे तयार झालेले गरमागरम टोस्ट कुठल्याही सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर खायला द्या. मला खात्री आहे की हे नवीन प्रकारचे टोस्ट सगळ्याना आवडतील.

शाकाहारी फ़्रेन्च टोस्ट (Eggless French Toast)



** Eggless French Toast: English Version **

साहित्य:

  • ब्रेड स्लाइस : ४-५
  • रवा: १/२ कप
  • दही: १/२ कप
  • बारीक चिरलेला कांदा: १/२ कप
  • बारीक किसलेले गाजर: १/४ कप
  • आले - हिरवी मिरचीची पेस्ट: चवीनुसार
  • बारीक चिरलेली कोथिंबीर: गरजेनुसार
  • चवीनुसार मीठ
  • तेल

कृती:

  • रवा, दही, कांदा, गाजर, आले- हिरवी मिरची पेस्ट, कोथिंबीर, मीठ हे सगळे साहित्य एका मोठ्या तोंडाच्या भांड्यात मिक्स करा. हे मिश्रण 5 मिनिटे तसेच ठेवा. 5 मिनिटे झाल्यावर हे मिश्रण जरा घट्ट होईल मग त्यात थोडे पाणी टाकून थोडे पातळ करा.
  • ब्रेड तुमच्या आवडीच्या आकारानुसार कापा. जर तुमच्या कडे कुकी कटर असेल तर त्याचा उपयोग करा म्हणजे लहान मुले खुश होतील.
  • एकीकडे एक नॉन स्टिक तवा गरम करायला ठेवा आणि तो तवा गरम झाल्यावर त्यावर थोडे तेल टाका. नंतर एक ब्रेड चा तुकडा तयार केलेल्या मिश्रणामधे चांगला बुडवा आणि गरम झालेल्या तव्यावर ठेवा. तव्यावर मावतील असे ब्रेड चे तुकडे ठेवा. प्रतेक तुकड्याच्या कडेने थोडे तेल सोडा. हे सगळे तुकडे दोनही बाजूने चांगले भाजा.
  • हे तयार झालेले गरमागरम टोस्ट कुठल्याही सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर खायला द्या. मला खात्री आहे की हे नवीन प्रकारचे टोस्ट सगळ्याना आवडतील.

माहितीचा स्रोत: Coffee

बदाम कुकी (Eggless Almond Cookies)



साहित्य:
  • मैदा: २ कप
  • लोणी: १ कप
  • पीठीसाखर: ३/४ कप
  • जाडसर कुटलेले बदाम: १ कप
  • वनिल्ला इसेन्से: १ टी स्पून
  • बेकिंग पावडर : १ टी स्पून

कॄती:
  • एका मोठया मिक्सिंग बोल मधे लोणी, साखर, बेकिंग पावडर , वनिल्ला इसेन्से मिक्स करा.
  • त्यात बदाम टाकुन सगळे नीट एकत्र करा. त्यात हळु हळु मैदा टाकुन सगळे साहित्य एकत्र करा. ह्या मिश्रणाचे गोळे होतील असे पीठ असले पाहीजे जर पीठ थोडे कोरडे असेल तर त्यात थोडे दूध टाका.
  • एका बाजूला ओवन ३२५ डिग्री फेरन्हाइट वर गरम करायला ठेवा आणि दुसरी कडे २ कुकी शीट वर कुकिंग स्प्रे स्प्रे करा म्हणजे कुकीज शीट ला चीकटणार नाही.
  • बदाम च्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करा किंवा एक मोठा गोळा करून त्याची जाड पोळी लाटा आणि कुकी कटर ने कुकी कापा. ह्या कुकीज कुकी शीट वर २ इंच अंतरावर ठेवा म्हणजे त्या बेक झाल्यावर एकमेकांना चिकटनार नाही.
  • ह्या कुकीज गरम झालेल्या ओवन मधे २० -२५ मिनिटे बेक करा.
  • ह्या कुकीज बेक झाल्यावर १०-१५ मिनिटे तशाच गार करायला ठेवा. ह्या कुकीज हवाबंद डब्यात ठेवा आणि जेव्हा पाहिजे तेव्हा खावा.

गाजर हलवा ( Carrot Halwa)


*** English Version: Gajar Halwa ***

साहित्य:
  • किसलेले गाजर: २ कप
  • दुध: ३ कप
  • साखर: १/२ कप (चविनुसार)
  • वेलदोडा पुड: १/२ टी स्पून
  • तुप: २ टेबल स्पून
  • बारिक कापलेले काजु आणि बदाम: २ टेबल स्पून
  • बेदाणे : १ टेबल स्पून

कॄती:

  • गाजर किसायला घेताना एका जाड बुडाच्या भांड्यामधे दुध गरम करायला ठेवा. आपल्याला हे दुध जितके जास्त आटवता येईल तितके आटवायचे आहे. अधुनमधुन दुध हलवत रहा.
  • एका वाटीत दुध घेऊन त्यात काजु, बदाम, बेदाणे भिजायला ठेवा.
  • एका जाड बुडाच्या भांड्यामधे तुप गरम करा. ह्या तुपात किसलेले गाजर ४-५ मिनिटे भाजा.
  • गाजर थोडे शिजल्यावर त्यात आटवलेले दुध घाला. जोपर्यन्त सगळे दुध आटत नाही तोपर्यन्त हे गाजर शिजवा.
  • नंतर त्यात साखर, काजु, बदाम, बेदाणे, वेलदोडा पुड घाला आणि सगळे नीट मि़क्स करा. हा हलवा अजुन ४-५ मिनिटे शिजवा. झाला गाजराचा हलवा तयार.
  • हा हलवा तुम्ही गरम अथवा गार खाऊ शकता.

नोट:

  • जर तुमच्याकडे खवा असेल तर तुम्ही तो ह्या हलव्या मधे वापरु शकता. खवा वापरला तर दुध थोडेच वापरा. खवा वापरुन हा हलवा लवकर तयार होतो.

मेथी पराठा (Methi Paratha)



*** Methi Paratha : English Version ***

साहित्य:
  • बारीक चिरलिली मेथीची पाने: २ कप
  • बारीक चिरलेली कोथिंबीर: १/२ कप
  • गव्हाचे पीठ: २ कप
  • तांदळाचे पीठ: १/२ कप
  • हिरवी मिरची, आले , लसूण पेस्ट: चवीनुसार
  • दही: १ टेबल स्पून
  • ओवा: १ टी स्पून
  • हळद
  • चवीनुसार मीठ
  • तेल किंवा तूप

कृती

  • मेथीच्या पाने आणि थोडे मीठ एकत्र हलवून १० मिनिटे बाजूला ठेवा.
  • नंतर त्यामधे बाकीचे साहित्य घालून चांगले एकत्र हलवा. त्यामधे थोडे पाणी टाकून पीठ चांगले मळून घ्या. शेवटी थोडे तेल घालून मळून घ्या आणि हे कणीक अर्धा तास तरी बाजूला तसेच ठेवा.
  • नंतर त्या कणीक चे छोटे छोटे गोळे करून ठेवा. गॅस वर एक तवा गरम करायला ठेवा. प्रत्येक गोळ्या चे पराठे लाटा. हा पराठा दोन्ही बाजूने चांगला भाजून घ्या. पराठा भाजताना थोडे तूप किंवा तेल लावा.
  • हा गरमागरम पराठा कोणत्याही चटणी किंवा लोणचे किंवा दही बरोबर छान लागतो.

पेरसींमोन मिल्कशेक (Persimmon Milkshake)


Persimmon Milkshake: English Version

साहित्य:
  • पेरसींमोन: १
  • दुध: १ कप
  • मध: १ टी स्पून
  • काजू, बदाम: प्रत्येकी २

कृती:

  • पेरसींमोन चे साल काढून फोडी करून घ्या.
  • फोडी, दुध, मध, काजू, बदाम एकत्र मिक्सर मधे किंवा ब्लेन्डयर मधे चांगले बारीक करून घ्या. झाला तुमचा पौष्टिक पेरसींमोन मिल्कशेक तयार.

तिळाची पुरी (Sesame Seeds Puri)


Sesame Seeds Puries: English Version

साहित्य:
  • मैदा : १ कप
  • गव्हाचे पीठ : ३/४ कप
  • तुप : २ टेबल स्पून
  • मिरे पुड : १/२ टी स्पून
  • बारीक़ चिरलेली हिरवी मिरची : २
  • बारीक़ चिरलेली कोथिंबीर: १ कप
  • भाजलेले तीळ: १/२ कप
  • लवंग
  • चवीनुसार लाल मिरची पुड
  • चवीनुसार मीठ
  • तळण्यासाठी तेल

कृती:

  • तेल सोडून सगळे साहित्य एका पराती मधे एकत्र करा. थोडे थोडे पाणी टाकून पीठ चांगले मळून घ्या. आपल्या नेहमीच्या पुरीच्या काणिके सारखीच ही कणीक असु द्यावीत. ही कणीक तशीच अर्धा तास झाकून ठेवा.
  • ह्या कणिकेचे छोटे छोटे गोळे करून ठेवा. एक गोळा घेऊन त्याची पुरी लाटा. ह्या पुरीवर थोडे भाजलेले तीळ आणि पाणी शिंपडा. ही पुरी आर्धि दुमडा आणि परत दुमडून त्याचा त्रिकोण तयार करा. पुरीचे पदर सुटू नये म्हणून पुरीच्या मधोमद लवंग खोचा. अशा सगळ्या पुर्‍या करून घ्या.
  • एका कढई मधे तेल गरम करून ह्या सगळ्या पुर्‍या बदामी रंगाच्या होईपर्यंत तळा.
  • ह्या गरमागरम पुर्‍या तुम्ही कोणत्याही केच अप, चटणी किंवा सॉस बरोबर खावा.

सौजन्य:

मेथी आणि मिक्स डाळी चा डोसा (Methi and Lentil Dosa)



Lentil Crepes With Methi Leaves : Read English Version Here

साहित्य:

  • मूग डाळ: १ कप
  • हरभरा डाळ: १/४ कप
  • हिरवा हरभरा डाळ: १/४ कप
  • उड़द डाळ: १/२ कप
  • तुर डाळ: १/४ कप
  • बारीक चिरलेली मेथी: १ कप
  • चवीनुसार हिरवी मिरची, आले, लसूण पेस्ट
  • शेंगदाना चटणी
  • कडीपत्ता: ४-५ पाने
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • हळद
  • चवीनुसार मीठ


कृती:

  1. सगळ्या डाळी धुवून कडीपत्ता घालून ७-८ तास किंवा रात्रभर भिजत ठेवा.
  2. ह्या भीजलेल्या डाळीमधे मीठ, हळद, हिरवी मिरची, आले, लसूण पेस्ट आणि पाणी टाकून चांगले बारीक करून घ्या.
  3. ह्या बारीक केलेल्या मिश्रणात कोथिंबीर आणि मेथी घालून चांगले एकजीव करा.
  4. एक नॉन स्टिक तवा गरम करा. त्यावर थोडे तेल सोडा आणि मग त्यावर १ डाव पीठ टाकून ते चांगले गोल पसरवा. त्यावर थोडी चटणी भूरभुरा आणि बाजूने थोडे तेल सोडा.
  5. हा डोसा जरा लालसर झाला की मग डिश मधे काढा. हा गरमागरम डोसा कोणत्याही चटणी, बटाटा भाजी किंवा सांबार बरोबर मस्त लागतो.

थालीपीठ पिझ्झा ( Thalipeeth Pizza)


*** Thalipeeth Pizza: Read English Version Here ***

साहित्य
बेस साठी:
  • थालीपीठ पीठ किंवा तुमच्या आवडीचे सगळी पीठे एकत्र करून : २ कप
  • बारीक़ चिरलेला कांदा : १/२ कप
  • आले, लसून आणि हिरव्या मिरचीची पेस्ट : चवीनुसार
  • हळद: १/४ टी स्पून
  • दही: १ टेबल स्पून
  • चवीनुसार मीठ
टॉपिंगसाठी
  • बारीक चिरलेल्या तुमच्या आवडीच्या भाज्या
  • कुठलीही चटणी किंवा लोणचे
  • बारीक़ किसलेले चीज
कृती
१) बारीक़ चिरलेला कांदा, आले, लसून आणि हिरव्या मिरचीची पेस्ट, दही, हळद आणि मीठ नीट मिक्स करा . हे मिक्स्चर तसेच १० मिनिटे ठेवा.
२) नंतर त्यात थालीपीठ पीठ आणि पाणी घालून चांगले मळून घ्या.
३) ह्या पीठाचे छोटे छोटे गोळे करा. एक ओले सूती कापड पोळपाट वर पसरून ठेवा पीठाचा गोळा हाताने पसरवा . हा पसरवलेला गोळा कापडावर ठेऊन ओल्या हाताच्या पंजा ने आणि बोटाने थापा .

४) तवा गरम करून त्यावर थोड़े तेल टाका आणि त्यावर थालीपीठ ठेवा बाजूने थोड़े तेल सोडा झाकण ठेऊन हे थालीपीठ एका बाजूने भाजून घ्या.नंतर हे थालीपीठ उलथून त्यावर चटणी पसरावा आणि भाज्या नीट पसरून लावा वर थोड़े चीज़ आणि मीठ टाका झाकण ठेऊन २ मिनिटे शिजू द्या. झाला तुमचा पिझ्झा तयार ह्या गरमा गरम पिझ्झा चे तुकडे करून सौसे बरोबर खायला द्या.

ग्रिल ब्रोकोली चाट (Grilled Brocolli Chat)


*** Grilled Brocolli Chat : Read English Version Here ***

साहित्य:
  • ग्रिल केलेले ब्रोकोली चे तुकडे
  • बारीक शेव
  • चाट मसाला
  • चिंचेची चटणी
  • चवीनुसार मीठ

कृती:

  • सगळे साहित्य आपल्या आवडीप्रमाणे एका मोठया भांड्यामधे चांगले एकत्र करा आणि हा चाट झाला तयार.