Showing posts with label पोळी - पराठा. Show all posts
Showing posts with label पोळी - पराठा. Show all posts

मेथी पराठा (Methi Paratha)



*** Methi Paratha : English Version ***

साहित्य:
  • बारीक चिरलिली मेथीची पाने: २ कप
  • बारीक चिरलेली कोथिंबीर: १/२ कप
  • गव्हाचे पीठ: २ कप
  • तांदळाचे पीठ: १/२ कप
  • हिरवी मिरची, आले , लसूण पेस्ट: चवीनुसार
  • दही: १ टेबल स्पून
  • ओवा: १ टी स्पून
  • हळद
  • चवीनुसार मीठ
  • तेल किंवा तूप

कृती

  • मेथीच्या पाने आणि थोडे मीठ एकत्र हलवून १० मिनिटे बाजूला ठेवा.
  • नंतर त्यामधे बाकीचे साहित्य घालून चांगले एकत्र हलवा. त्यामधे थोडे पाणी टाकून पीठ चांगले मळून घ्या. शेवटी थोडे तेल घालून मळून घ्या आणि हे कणीक अर्धा तास तरी बाजूला तसेच ठेवा.
  • नंतर त्या कणीक चे छोटे छोटे गोळे करून ठेवा. गॅस वर एक तवा गरम करायला ठेवा. प्रत्येक गोळ्या चे पराठे लाटा. हा पराठा दोन्ही बाजूने चांगला भाजून घ्या. पराठा भाजताना थोडे तूप किंवा तेल लावा.
  • हा गरमागरम पराठा कोणत्याही चटणी किंवा लोणचे किंवा दही बरोबर छान लागतो.

रताळ्याची घारी (Sweet Potato Roti)


साहित्य
  • उकडलेल्या रताळ्याचा गर: १ कप
  • किसलेला गुळ: १ कप
  • गव्हाचे पीठ: लागेल तसे
  • वेलदोडा पूड: १ टी स्पून
  • चवीनुसार मीठ
  • तेल किंवा तूप
कृती
१ ) रताळ्याचा गर जरा गरम असतानाच त्यात गुळ, मीठ, वेलदोडा पूड टाकून चांगले मिक्स करा. रताळ्याचा गर आणि गुळ जरा एकजीव झाला पाहिजे.
२) नंतर त्यात थोडे थोडे गव्हाचे पीठ टाकून चांगले मळून घ्या. हे कणीक नेहमीच्या चपातीच्या कणिके सारखे राहुदेत. हे कणीक मळताना पाणी टाकु नये. सगळ्यात शेवटी थोडे तेल किंवा तूप टाकून कणीक चांगली मळून घ्या. ही कणीक १/२ तास ओल्या फडक्याणे झाकून ठेवा.
३) ह्या कानिकेचे तुमच्या मर्जी प्रमाणे गोळे करून ठेवा. एका बाजूला गॅस वर तवा गरम करायला ठेवा आणि एका बाजूला घारी लाटायला घ्या. ही घारी चपाती पेक्षा थोडी जाड असावी.
४) तवा गरम झाल्यावर त्यावर थोडे तेल किंवा तूप टाका आणि मग घारी दोनही बाजुंनी चांगली भाजून घ्या. घारी भाजताना थोडे तेल किंवा तूप लावा.
५) ही गरमगरम घारी कोमट दूधाबारोबर किंवा कोणत्याही भाजी, लोणच्या बरोबर खावा.

टिप
१) ही घारी ८-१० दिवस चांगली टिकते त्यामुळे प्रवासात न्यायला काही हरकत नाही.
२) तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ही घारी पुरी च्या आकाराची करून तळुन घेऊ शकता.
३) रताळ्या प्रमाणे तुम्ही पिकलेल्या केळाची आणि लाल भोपळ्याची सुधा घारी करू शकता.

Sweet Potato Roti
Ingredients
  • Sweet Potato(Boiled & Mashed): 1 Cup
  • Shredded Jaggery: 1 Cup
  • Cardamom Powder: 1 tsp
  • Wheat Flour: As required
  • Salt to Taste
  • Oil or Ghee
Procedure
  1. Mix boiled, mashed sweet potato, jaggery, salt, cardamom powder very well so that jaggery will almost dissolve in sweet potato.
  2. Then add wheat flour slowly. Mix all ingredients very well. Add wheat flour till you get nice dough. Don't add any water. Knead the dough very well by adding little oil or ghee. Cover this dough with wet cotton cloth. Keep aside for atleast half hour.
  3. Then make small ping pong ball size balls. Roll them with rolling pin just like regular roti.
    Heat tava on gas. Apply some ghee or oil on tava. Transfer roti on tava. Cook roti from both sides on medium flame.
  4. Serve this hot roti with warm milk or pickle.
Tips
  1. Instead of sweet potato you can use rippen bananas, pumkin, potato.
  2. Don't use sugar instead of jaggery otherwise roti will become very hard to eat.
  3. If you want you can make these roti puri size and dip fry it.
  4. These rotis remains good for 7-10 days so these are good for travel.
    This is my another entry for Srivalli's Roti Mela

पुरणपोळी (Puran Poli)




साहित्य
हरभरा डाळ (चणा डाळ): १ वाटी
किसलेला गुळ: १ वाटी
वेलदोडा पुड: १ टीस्पुन
जायफळ पुड:१/४ टीस्पुन
मैदा: १/२ वाटी
गव्हाचे पीठ: १/२ वाटी
मीठ चवीनुसार
तेल
तुप


कृती

डाळ धुवून घेउन कमीत कमी १/२ तास पाण्यात भिजत ठेवा.


मैदा, गव्हाचे पीठ, मीठ एकत्र मिक्स करून घ्या। त्यात थोड़े तेल व पाणी घालून चांगले मळून घ्या. हे पीठ ओल्या फडक्याणे २ तास झाकुनठेवा। अधूनमधून थोडे तेल टाकून कणीक पीठ चांगले मळून घ्या. वाटल्यास लाटण्याने ते कणीक ३-४ मिनिटे चांगले कुटून घ्या. असे कमीत कमी ३-४ वेळा तरी करा


जास्त पाण्यात डाळ चांगली शिजवून घ्या. प्रेसर कुक्कर मधे २-३ शिट्या देऊन घ्या. डाळ थोडी गरम असतानाच चाळणीत ओतून त्यातले सगळे पाणी काढून घ्यावे. हे पाणी फेकून न देता ते कटाच्या आमटी करता किवा सूप करता वापरा.


एक कढई गरम करून त्यात डाळ, गुळ घालून पुरण ३-४ मिनिटे शिजवून घावे. हे पुरण शिजवतना त्यात वेलदोडा पुड व जायफळ पुड घालावी. पुरण गार झाल्यावर पुरण वाटण्याच्या यंत्राने किवा फुड प्रोसेस्सेर मधे चांगले वाटून घ्यावे याप्रमाणे पुरण तयार करून घ्यावे

कणीक परत चांगली मळुन घेऊन त्याचे छोटे छोटे गोळे करावेत व त्याच्या दुप्पट पुरण घेऊन त्याचे गोळे करून ठेवा


हाताला थोडे तेल अगर पीठ लावून पीठाचा गोळा घ्या. तो हाताने थोडा दाबून मोठा करा. त्यात पुरणाचा गोळा ठेऊन त्याचा नीट गोळा करावा. पोळ्पाटावर थोडे पीठ टाकून हलक्या हाताने पोळी लाटावी. जर तुम्हाला पुराण बाहेर येण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही पोळी हाताने दाबून पण करू शकता. गरम तव्यावर थोडे तूप टाकून ही पोळी बदामी रंगावर भाजा. ही गरमागरम पोळी कटाची आमटी किवा तूप किवा दुधा बरोबर खावी



टिप
१) वरती सांगितल्या प्रमाणे कणीक चांगली मळून घ्या म्हणजे पोळ्या कडक होणार नाहीत.
२) पोळी एकदम नाजूक हाताने लाटा म्हणजे ती फुटनार नाही
३) तुम्ही गुळा एवजी साखर सुधा वापरु शकता.
४) ह्या पोळ्या आणि पुराण फ्रीज़ मधे २ आठवडे चांगले टिकते
५) तुम्हाला आवडत असेल तर पुराण शिजत असताना त्यात थोडा खवा अथवा खोवलेले खोबरे घालावे.


Puran Poli

Ingredients
For Stuffing
Channa Daal (Split Chick Pea or Bengal gram): 1 Cup
Grated Jaggery (Gur): 1 Cup
Cardamom Powder: 1 tsp
Nutmeg Powder: 1/4 tsp

For Cover:
Maida (All Purpose Flour): 1/2 Cup
Wheat Flour: 1/2 Cup
Salt to Taste
Oil
Ghee (Clarified Butter)

Procedure
  1. Wash daal & soak in plenty of water for about half hour.
  2. Mix maida with wheat flour, salt. Add water, oil and make soft, pliable dough. Cover with a wet cloth and keep aside for at least 2 hrs. In between knead the dough by punching it for 3-4 minutes or you can place dough on flat surface & beat the dough with rolling pin. Add 2-3 tsp oil while doing this. Do this at least for 4-5 times. Make fine, soft & smooth dough.
  3. Cook channa daal with sufficient water in pressure cooker. Don't overcook the daal. Then drain excess water using colander. Don't throw this water use this water to make Katachi Aamti (Rasam / Soup).
  4. Heat kadhai and add channa daal. Fry till all water get evaporates. Then add jaggery, cardamom powder and nutmeg powder. Mix well everything for 5 minutes. Then grate the puran with puran making machine or you can mix it in mixer or food processer.
  5. Divide the dough into small balls. Divide puran in balls double the size of dough balls. Keep these balls aside.
  6. With greased palms take one ball of dough, flatten it into a disc of the size of palm. Place one ball of puran(stuffing) in the center and fold all the edges of disc to cover the puran ball. Flatten the ball with palm.
  7. Tie muslin cloth on rolling board. Then sprinkle some flour on rolling board or any flat surface, place this stuffed ball and roll it gently. Make sure puran did not get out so roll poli very gently. Don’t turn poli while rolling turn your rolling board so that poli will not stick to the board. If you think poli is sticking to rolling board use some flour. To avoid puran coming out of poli you can make poli by pressing the ball with palm on plastic sheet. For this use oil instead of flour.
  8. Heat tava and place some ghee or oil on it. Gently lift the poli & place it on tava. Cook both sides until color changes to light brown. Apply ghee while cooking. While roasting poli just don’t turn poli lot of times just turn for 2-3 times. Follow the same procedure for remaining balls.
  9. Serve hot puran poli with ghee or warm milk or katachi aamati .
Notes
  1. Make sure knead the dough according to procedure otherwise polis will not become soft.
  2. Be gentle while rolling the poli.
  3. Puran or puran poli will remain good for 2 weeks in fridge.
  4. You can use sugar instead of jaggery.
  5. If you want you can use shredded coconut or khoya (mawa). Add them when you add jaggery to the daal.