Showing posts with label झटपट होणारे पदार्थ. Show all posts
Showing posts with label झटपट होणारे पदार्थ. Show all posts

सोयाबीन कटलेट (Soyabean Cutlets)






साहित्य : 
  • अर्धा कप सोया ग्रनुअल्स
  • अर्धा कप उकडलेले मुग
  • एक उकडलेला बटाटा
  • पाव कप बारीक चिरलेला कांदा
  • एक टी स्पून गरम मसाला
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • चवीनुसार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि मीठ
  • थोडा रवा
  • तेल 

कृती :


  • सोया ग्रनुअल्स शिजवून घेऊन त्यातले पाणी काढून टाका. बटाटा चांगला मॅश करून घ्या. 
  • एका पसरट भांड्यामध्ये सोया ग्रनुअल्स, मुग, बटाटा, कांदा, गरम मसाला, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि मीठ टाकून चांगले मिक्स करून घ्या. 
  • एका बाजूला नॉन स्टिक तवा गरम करायला ठेवा. तयार केलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून दाबून त्यांना कटलेट चा आकार द्या.
  • एका प्लेट मध्ये रवा पसरवा. त्या रव्यावर कटलेट ठेवून कटलेट दाबा म्हणजे रवा कटलेट ला चांगला लागेल. हा रवा कटलेट च्या दोनही बाजूना लावा. 
  • गरम झालेल्या तव्यावर तेल टाकून हे कटलेट त्यावर दोनही बाजूने तांबूस होईपर्यंत भाजा. 
  • हे गरमागरम कट्लेट कुठल्याही सॉस किंवा चटणी बरोबर खायला द्या.  

तृप्ती

मेथी नाचणी सूप (Methi Ragi Soup)

Methi Ragi Soup

साहित्य:
  • एक टे. स्पून नाचणीचे पीठ
  • एक कप बारीक चिरलेली मेथी
  • थोडा बारीक किसलेला लसूण
  • प्रत्येकी एक टे. स्पून शेंगदाण्याचा कुट किंवा बदाम पूड आणि तूप
  • २-३ कप पाणी
  • एक टी स्पून ओवा
  • चवीपुरते मीठ, मिरे पूड
  • सजावटी साठी किसलेले खोबरे 

कृती :
  • सगळ्यात आधी एक कप पाण्यात नाचणीचे पीठ कालवून पातळ पेस्ट तयार करा. 
  • एका भांड्यामध्ये तूप गरम करून त्यात लसुणाची फोडणी करून ओवा, थोडे मीठ आणि मेथी टाका. मेथी थोडी हलवा आणि २-३ मिनिटे शिजू द्या. 
  • नंतर त्यात उरलेले पाणी, थोडे मीठ, मिरे पूड, शेंगदाण्याचा कुट किंवा बदाम पूड घाला. हा सूप गार झाला कि थोडा घट्ट होतो त्यामुळे पाणी जरा जास्तच घाला. 
  • पाणी चांगले उकळले कि त्यात नाचणीची पेस्ट टाकून थोड्या थोड्या वेळाने हलवत राहा. ४-५ मिनिटे सूप चांगला शिजू द्या. हा गरमागरम सूप बोल मध्ये काढून त्यावर खोबरे टाकून खायला द्या.


तृप्ती
Fashion Deals For Less














काकडीचा डोसा (Cucumber Dosa)








साहित्यः
  • १ कप गव्हाचे पीठ
  • १/४ कप तांदळाचे पीठ
  • १/४ कप बारिक रवा
  • २ कप कापलेली काकडी
  • चविनुसार हिरव्या मिरच्या, मीठ
  • थोडे तेल

कृती:
  • मिक्सरमध्ये काकडी, मीठ आणि मिरची घालून चांगली पेस्ट तयार करून घ्या.
  • नंतर ह्या पेस्ट मध्ये गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ,रवा आणिगरजेपुरते पाणी घालून चांगले हलून घ्या.
  • ह्या पीठाचे नेहमीच्या डोस्यासारखे डोसे तयार करा.
  • हे गरमागरम डोसे कोणत्याही चटणी,सॉस किन्वा बटाट्याच्या भाजी बरोबर खाता येतील.

तृप्ती
Fashion Deals For Less





हिरव्या वाटाण्याचा सुप (Green Peas Soup)


**** Green Peas Soup: Click Here For English Version ****

साहित्यः
  • ताजे किंवा फ्रोजन हिरवे वाटाणेः २ कप
  • ताजे किंवा फ्रोजन कणसाचे दाणेः १ कप
  • नारळाचे दुधः १ कप
  • कापलेला कांदाः १ कप
  • कापलेले आले - लसुणः १/२ टेबल स्पून
  • लोणीः १ टेबल स्पून
  • वेजिटेबल स्टॉक किंवा चिकन स्टॉक किंवा पाणीः ३-४ कप
  • चविनुसार मीठ , लाल मिरची पुड, मीरे पुड

कृतीः
  • एका उभ्या भांड्यामध्ये लोणी गरम करा. त्यात कांदा आणि आले - लसुण टाकून कांदा पारदर्शक होइपर्यंत भाजा.
  • नंतर त्यात वाटाणा आणि कणसाचे दाणे टाकून चांगले मिसळून ३-४ मिनिटे शिजू द्या.
  • त्यात लाल मिरची पुड आणि मीरे पुड टाकून चांगले हलवा.
  • नंतर त्यात नारळाचे दुध, मीठ आणि वेजिटेबल स्टॉक किंवा चिकन स्टॉक किंवा पाणी टाका.
  • हे सगळे वाटाणा आणि कणसाचे दाणे चांगले माउ होइपर्यंत शिजवा.
  • नंतर भांडे बाजुला ठेउन मिश्रण थोडे गार होण्यासाठी ठेउन द्या.
  • थोड्यावेळाने हे मिश्रण ब्लेंडर मधून बारिक करून घ्या. हवे असल्यास अजून पाणी किंवा स्टॉक घाला.
  • एका बोल मध्ये हा सुप घालून त्यावर दही किंवा क्रिम ने सजावट करा. हा सुप तुम्ही गरमागरम अथवा गार पियू शकता.

फ्रेंच टोस्ट (Savory French Toast)



*** Savory French Toast: Click Here for English Version ***

साहित्य:
  • अंडी: २
  • ब्रेडः ४-५
  • बारिक चिरलेला कांदा: २ टेबल स्पून
  • बारिक चिरलेली कोथिंबीर: १ टेबल स्पून
  • चवीनुसार लाल मिरची पुड
  • चवीनुसार मीठ
  • तेल

कृती:

  • मोठ्या तोंडाच्या एका बोल मध्ये अंडी, कांदा, कोथिंबीर, लाल मिरची पुड, मीठ नीट मिक्स करा.
  • ब्रेड तुमच्या आवडीच्या आकारानुसार कापा. जर तुमच्या कडे कुकी कटर असेल तर त्याचा उपयोग करा म्हणजे लहान मुले खुश होतील.
  • एकीकडे एक नॉन स्टिक तवा गरम करायला ठेवा आणि तो तवा गरम झाल्यावर त्यावर थोडे तेल टाका. नंतर एक ब्रेड चा तुकडा तयार केलेल्या मिश्रणामध्ये चांगला बुडवा आणि गरम झालेल्या तव्यावर ठेवा. तव्यावर मावतील असे ब्रेड चे तुकडे ठेवा. प्रतेक तुकड्याच्या कडेने थोडे तेल सोडा. हे सगळे तुकडे दोनही बाजूने चांगले भाजा.
  • हे तयार झालेले गरमागरम टोस्ट कुठल्याही सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर खायला द्या. मला खात्री आहे की हे नवीन प्रकारचे टोस्ट सगळ्याना आवडतील.

व्हेजिटेबल स्टिर फ्राय (Vegetable Stir Fry)



*** Vegetable Stir Fry ***

साहित्य:
  • उभे चिरलेले गाजरः १ कप
  • उभी चिरलेली फरसबीः १ कप
  • उभी चिरलेली ढबू मिरचीः १ कप
  • उभा कापलेला कोबीः १ कप
  • उभे कापलेली ब्रोकोलीची फुलेः १ कप
  • बारीक चिरलेले आलः १ टी स्पून
  • बारीक चिरलेला लसुणः २ टी स्पून
  • सोया सॉस: १ टेबल स्पून
  • चिली सॉस: चविनुसार
  • तेलः १ टेबल स्पून
  • चविनुसार मीठ

कृती:
  • एका नॉन स्टिक भांड्यामध्ये तेल गरम करा.
  • गरम झालेल्या तेलामध्ये आले आणि लसूण टाका. हे आले लसूण २ मिनिटे लालसर होईपर्यंत भाजा.
  • त्यात सगळ्या भाज्या एका पाठोपाठ एक टाका. ज्या भाजीला शिजायला जास्त वेळ लागतो ती भाजी आधी टाका. सगळ्या भाज्या नीट एकत्र करा.
  • नंतर त्यात सोय सॉस, चिली सॉस आणि मीठ टाकून सगळे नीट हलवा.
  • ह्या भाज्या झाकण लावून थोडा वेल शिजू द्याव्यात. ह्या भाज्या जास्त शिजवू नका त्या मग चांगल्या लागणार नाहीत.
  • हे गरमागरम व्हेजिटेबल स्टिर फ्राय तुम्ही पांढऱ्या भाताबरोबर किंवा तसेच खाऊ शकता.

शाकाहारी फ़्रेन्च टोस्ट (Eggless French Toast)



** Eggless French Toast: English Version **

साहित्य:

  • ब्रेड स्लाइस : ४-५
  • रवा: १/२ कप
  • दही: १/२ कप
  • बारीक चिरलेला कांदा: १/२ कप
  • बारीक किसलेले गाजर: १/४ कप
  • आले - हिरवी मिरचीची पेस्ट: चवीनुसार
  • बारीक चिरलेली कोथिंबीर: गरजेनुसार
  • चवीनुसार मीठ
  • तेल

कृती:

  • रवा, दही, कांदा, गाजर, आले- हिरवी मिरची पेस्ट, कोथिंबीर, मीठ हे सगळे साहित्य एका मोठ्या तोंडाच्या भांड्यात मिक्स करा. हे मिश्रण 5 मिनिटे तसेच ठेवा. 5 मिनिटे झाल्यावर हे मिश्रण जरा घट्ट होईल मग त्यात थोडे पाणी टाकून थोडे पातळ करा.
  • ब्रेड तुमच्या आवडीच्या आकारानुसार कापा. जर तुमच्या कडे कुकी कटर असेल तर त्याचा उपयोग करा म्हणजे लहान मुले खुश होतील.
  • एकीकडे एक नॉन स्टिक तवा गरम करायला ठेवा आणि तो तवा गरम झाल्यावर त्यावर थोडे तेल टाका. नंतर एक ब्रेड चा तुकडा तयार केलेल्या मिश्रणामधे चांगला बुडवा आणि गरम झालेल्या तव्यावर ठेवा. तव्यावर मावतील असे ब्रेड चे तुकडे ठेवा. प्रतेक तुकड्याच्या कडेने थोडे तेल सोडा. हे सगळे तुकडे दोनही बाजूने चांगले भाजा.
  • हे तयार झालेले गरमागरम टोस्ट कुठल्याही सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर खायला द्या. मला खात्री आहे की हे नवीन प्रकारचे टोस्ट सगळ्याना आवडतील.

माहितीचा स्रोत: Coffee

पेरसींमोन मिल्कशेक (Persimmon Milkshake)


Persimmon Milkshake: English Version

साहित्य:
  • पेरसींमोन: १
  • दुध: १ कप
  • मध: १ टी स्पून
  • काजू, बदाम: प्रत्येकी २

कृती:

  • पेरसींमोन चे साल काढून फोडी करून घ्या.
  • फोडी, दुध, मध, काजू, बदाम एकत्र मिक्सर मधे किंवा ब्लेन्डयर मधे चांगले बारीक करून घ्या. झाला तुमचा पौष्टिक पेरसींमोन मिल्कशेक तयार.

थालीपीठ पिझ्झा ( Thalipeeth Pizza)


*** Thalipeeth Pizza: Read English Version Here ***

साहित्य
बेस साठी:
  • थालीपीठ पीठ किंवा तुमच्या आवडीचे सगळी पीठे एकत्र करून : २ कप
  • बारीक़ चिरलेला कांदा : १/२ कप
  • आले, लसून आणि हिरव्या मिरचीची पेस्ट : चवीनुसार
  • हळद: १/४ टी स्पून
  • दही: १ टेबल स्पून
  • चवीनुसार मीठ
टॉपिंगसाठी
  • बारीक चिरलेल्या तुमच्या आवडीच्या भाज्या
  • कुठलीही चटणी किंवा लोणचे
  • बारीक़ किसलेले चीज
कृती
१) बारीक़ चिरलेला कांदा, आले, लसून आणि हिरव्या मिरचीची पेस्ट, दही, हळद आणि मीठ नीट मिक्स करा . हे मिक्स्चर तसेच १० मिनिटे ठेवा.
२) नंतर त्यात थालीपीठ पीठ आणि पाणी घालून चांगले मळून घ्या.
३) ह्या पीठाचे छोटे छोटे गोळे करा. एक ओले सूती कापड पोळपाट वर पसरून ठेवा पीठाचा गोळा हाताने पसरवा . हा पसरवलेला गोळा कापडावर ठेऊन ओल्या हाताच्या पंजा ने आणि बोटाने थापा .

४) तवा गरम करून त्यावर थोड़े तेल टाका आणि त्यावर थालीपीठ ठेवा बाजूने थोड़े तेल सोडा झाकण ठेऊन हे थालीपीठ एका बाजूने भाजून घ्या.नंतर हे थालीपीठ उलथून त्यावर चटणी पसरावा आणि भाज्या नीट पसरून लावा वर थोड़े चीज़ आणि मीठ टाका झाकण ठेऊन २ मिनिटे शिजू द्या. झाला तुमचा पिझ्झा तयार ह्या गरमा गरम पिझ्झा चे तुकडे करून सौसे बरोबर खायला द्या.

ग्रिल ब्रोकोली चाट (Grilled Brocolli Chat)


*** Grilled Brocolli Chat : Read English Version Here ***

साहित्य:
  • ग्रिल केलेले ब्रोकोली चे तुकडे
  • बारीक शेव
  • चाट मसाला
  • चिंचेची चटणी
  • चवीनुसार मीठ

कृती:

  • सगळे साहित्य आपल्या आवडीप्रमाणे एका मोठया भांड्यामधे चांगले एकत्र करा आणि हा चाट झाला तयार.

दुधी रायता ( Bottle Gourd Raita)



*** Bottle Gourd Raita -Click Here For English Version ***

साहित्य:

  • किसलेला दुधी भोपळा: १ कप
  • गार दही: २ कप
  • बारीक चिरलेला कांदा: १ टेबल स्पून
  • बारीक चिरलेली कोथिंबीर: १ टेबल स्पून
  • बारीक चिरलेला टोमॅटो: १ टेबल स्पून
  • जीरे पूड: १ टी स्पून
  • चवीनुसार मीठ

कृती

किसलेला भोपळा पारदर्शक होईपर्यंत पाण्यात शिजवून घ्या. जास्त झालेले पाणी गाळुन काढून टाका आणि भोपळा थोडावेळ गार करायला ठेवा. तोपर्यंत दही चांगले फेटून घ्या. मग ह्या दह्यामधे सगळे साहित्य टाकून चांगले मिक्स करा. दही गार असल्यामुळे तुम्ही हा रायता लगेच खाऊ शकता किंवा १ तास फीज़ मधे ठेवा. हा गार रायता तुम्ही बिर्यानी किंवा भाजी - चपाती बरोबर खाऊ शकता.

हनी ड्यू मेलन आणि खरबूज सूप


*** Honeydew Melon and Cantaloupe Soup *** Click Here For English Version

साहित्य:
  • हनी ड्यू मेलन लहान तुकडे केलेले: १ कप
  • खरबूज लहान तुकडे केलेले: २ कप
  • लिंबाचा रस: १/४ कप
  • साखर: १ टी स्पून (किंवा अधिक)
  • चवीनुसार मीठ आणि मिरे पूड
  • पुदीना किंवा कोथिंबीर ची पाने



कृती:


एका मिक्सर च्या भांड्यात पुदीना किंवा कोथिंबीर ची पाने सोडून सगळे साहित्य टाका आणि एकदम बारीक पेस्ट तयार करा. ही पेस्ट एका भांड्यामधे काढून फ्रीज़ मधे २-३ तास गार होण्यासाठी ठेवा. हा सूप प्यायला देताना एका बाउल मधे सूप काढा आणि त्यावर मीरे पूड आणि पुदीना किंवा कोथिंबीर ची पाने टाका. असा हा गार सूप उन्ह्याच्या दिवसात कोणालाही आवडेल.

ग्रिल कलिंगड सलाड (Grilled Watermelon Salad)


**** Grilled Watermelon Salad - English Version ****

साहित्य:
  • कलिंगडच्या मोठ्या फोडी: २
  • चेरी: ८-१०
  • हिरवी द्राक्षे: ८-१०
  • ओलिव तेल: १ टी स्पून
  • संत्र्याचा रस: १ टेबल स्पून
  • लिंबाचा रस: १ टेबल स्पून
  • चाट मसाला: गरजेनुसार
कृती:
  • कलिंगडच्या फोडीचे छोटे छोटे तुकडे करा. ते तुकडे ग्रिल वर १ मिनिटे भाजा. जर तुमच्या कडे मोठे ग्रिल असेल तर कलिंगडच्या मोठ्या फोडीच ग्रिल करा आणि नंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करा.
  • चेरी च्या बिया काढा. चेरी आणि द्राक्षाचे ४ तुकडे करा.
  • सगळे साहित्य एका भांड्यामधे चांगले एकत्र करून घ्या. झाले तुमचे ग्रिल कलिंगड सलाड तयार.

काकडीचा वडा (Cucumber Vada)



साहित्य:

  • जाडसर किसलेली मोठी काकडी: १
  • नाचणी चे पीठ: १/४ वाटी
  • तांदळाचे पीठ: १/४ वाटी
  • ज्वारीचे पीठ: १/४ वाटी
  • डाळीचे पीठ (बेसन): १ वाटी
  • बारीक चिरलेली कोथिंबीर: १/२ वाटी
  • बारीक चिरलेली हिरवी मिरची: २-३
  • हळद: १/२ टी स्पून
  • धणे पूड: १/२ टी स्पून
  • जीरे: १ टी स्पून
  • ओवा: १ टी स्पून
  • चवीनुसार मीठ
  • तळण्यासाठी तेल
कृती:
किसलेल्या काकडी मधे मीठ, जीरे, ओवा, धणे पूड, हळद, मिरची आणि कोथिंबीर टाकून चांगले हलवा. हे मिश्रण १० -१५ मिनिटे तसेच बाजूला ठेवा. मीठामुळे काकडी ला पाणी सुटेल. त्यात सगळी पीठे टाका आणि चांगले मिक्स करा. हवे असेल तर थोडे पाणी टाका. वडे हाताने थापायचे आहेत त्यामुळे हे मिश्रण जास्त पातळ करू नका. एका बाजूला एका कढई मधे तेल तापत ठेवा. काकडी च्या मिश्राणाचे लिंबू च्या आकराएव्हडे गोळे करा. एका प्लास्टिक च्या कागदावर हे वडे थापा. तेल गरम झाल्यावर हे वडे मध्यम आचेवर चांगले तळुन घ्या. हे गरमा गरम वडे कोणत्याही चटणी, दही किंवा साँस बरोबर खावा.


Multigrain Cucumber Vada

Ingredients:

  • Thick Grated Cucumber: 1
  • Ragi Flour: 1/4 Cup
  • Rice Flour: 1/4 Cup
  • Jawar Flour: 1/4 Cup
  • Besan (Chickpea Flour): 1 Cup
  • Finely Chopped Green Chillies: 2-3
  • Finely Chopped Coriander: 1/2 Cup
  • Turmeric Powder: 1/2 tsp
  • Coriander Powder: 1/2 tsp
  • Cumin Seeds: 1 tsp
  • Ajwain: 1 & 1/2 tsp
  • Salt to taste
  • Oil for Frying
Procedure:
  1. Add salt, all powders, cumin seeds, ajwain to grated cucumber. Mix very well. Keep this aside for 10 -15 minutes.
  2. Then add remaining ingredients to cucumber mixture. Add cucumber will leave water you may or may not need water to knead the dough.
  3. Make small lemon size balls of this dough.
  4. On a plastic sheet, shape vadas with these balls.
  5. Heat oil in the kadai and fry these vadas till it ger little bit red on medium heat.
  6. Serve these hot vadas with any sauce, ketch up, chutney or curd.

Source:
Anjali of Anna Parabrahma

चिंचेची चटणी (Tamarind Chutney)



साहित्य:
  • चिंच : १/२ वाटी किंवा चिंचेचा तयार कोळ: १/४ वाटी
  • बिया काढलेले खजूर: १/२ वाटी
  • गुळ: १/४ वाटी
  • लाल मिरची पूड: १ टी स्पून
  • जीरे पूड: १ टी स्पून
  • धणे पूड: १ टी स्पून
  • चवीनुसार मीठ
कृती:
चिंच आणि खजूर चांगले धुवून घ्या। एका मोठ्या वाटी मधे १ वाटी पाणी घालून चिंच आणि खजूर ५-६ तास भिजत ठेवा. नंतर सगळे साहित्य मिक्सर मधे चांगले बारीक करा. गरज लागली तर थोडे पाणी टाका. ही पेस्ट गाळणीने गाळुन घ्या आणि बाटलीमधे भरून ठेवा. ही चटणी फ्रीज़ मधे महिना भर छान टिकते.
जर तुम्ही घाईत असाल तर ४ वाटी पाणी घालून सगळे साहित्य एकत्र करून चांगले २०-२५ मिनिटे उकळून घ्या आणि बाकीची कृती तशीच करा.


Tamarind Chutney

Ingredients:
  • Deseeded Tamarind / Imli : 1/2 Cup or Tamarind Pulp: 1/4 Cup
  • Deseeded Dates / Khajur: 1/2 Cup
  • Jaggery / Gur: 1/4 Cup
  • Red Chilli Powder: 1 tsp (Adjust as per taste)
  • Cumin Powder: 1 tsp
  • Coriander Powder: 1 tsp
  • Salt to Taste
Procedure:
  1. Wash dates and tamarind and place them in a bowl. Add 1 cup water & keep aside for 5-6 hrs.
  2. After 5-6 hrs, blend all ingredients in a blender until smooth. If required add some water.
  3. Strain the mixture through sieve.
  4. Keep this chutney in a air- tight container.
  5. Keep it refrigerated. It will remain good for atleast 3weeks.
Tips
  • If you are in hurry, you can place all ingredients and 4 cups water in a saucepan. Boil for 20-25 minutes. Strain it.
  • The chutney should be little bit sweet than sour.

लसूण चटणी (Garlic Chutney)

साहित्य:
  • सोललेला लसूण: १ वाटी
  • लाल मिरची पूड: १ टेबल स्पून
  • लिंबाचा रस: १ टेबल स्पून
  • चवीनुसार मीठ
कृती:
सगळे साहित्य एकत्र करून मिक्सर मधे बारीक करा. झाली तुमची चटणी तयार. ही चटणी हवाबंद बाटलीत ठेऊन फ्रीज़ मधे ठेवा. कमीत कमी १ महिना तरी चांगली टिकेल. जरूरी प्रमाणे चटणी काढून घ्या आणि त्यात थोडे पाणी टाकून मग ती चटणी वापरा. ही चटणी तुम्ही कुठल्याही स्नॅक बरोबर खाउ शकता.




Garlic Chutney

Ingredients:

  • Garlic Cloves, Peeled: 1 Cup
  • Chilli Powder: 1 tbsp
  • Lemon Juice: 1 tbsp
  • Salt to Taste
Procedure
  1. Combine all ingredients and blend it with 1/4 cup of water to smooth paste. Keep it refrigerated.
  2. Before using, dilute with water and use as required.

गाजर सँडविच (Carrot Sandwich)


साहित्य
  • ब्रेड: ४
  • किसलेले मध्यम आकाराचे गाजर: २
  • सोया सॉस: १ टी स्पून
  • लाल मिरची पूड: १/२ टी स्पून
  • हळद: १/४ टी स्पून
  • बारीक उभा कापलेला कांदा: १/२
  • आले - लसूण पेस्ट: १/२ टी स्पून
  • तेल: १ टेबल स्पून
  • कोरडी शेंगदाण्याची चटणी किंवा दोडक्याच्या शिरांची चटणी: लागेल तशी
  • चविनुसार मीठ
कृती
१) एका कढई मधे तेल गरम करायला ठेवा. हे तेल गरम झाले की त्यात कांदा टाका.
२)कांदा थोडा भाजल्यावर त्यात बारीक किसलेले गाजर टाका आणि ३-४ मिनिटे भाजा.
३)नंतर त्यात सोया सॉस, लाल मिरची पूड, हळद, आले - लसूण पेस्ट, मीठ टाकून चांगले हलवा. हे सगळे मिश्रण चांगले शिजू द्यावे. शीजल्यावर हे मिश्रण एका वाटीत काढून ठेवा.
४) नंतर ब्रेड च्या स्लाइस वर थोडी तुमच्या आवडीची चटणी टाका. त्यावर गजाराचे मिश्रण पसरवा आणि परत त्यावर चटणी भूरभुरा.
५) नंतर हे सँडविच, सँडविच मेकर मधे ठेवा. तयार झालेले सँडविच तुमच्या आवडीच्या सॉस बरोबर खावा.

Carrot Sandwich
Ingredients
  • Bread Slices: 4
  • Finely Grated Medium Sized Carrots: 2
  • Soya Sauce: 1 tsp
  • Red Chillie Powder: 1/2 tsp
  • Turmeric Powder: 1/4 tsp
  • Finely Sliced Onion: 1/2
  • Ginger Garlic Paste: 1/2 tsp
  • Oil: 1 tbsp
  • Dry Peanut Chutney or Dry Ridge Gourd Skin Chutney
  • Salt to Taste

Procedure
  1. Heat oil in a small kadhai. When oil warms add onion slices.
  2. When onion slices become translucent add finely grated carrots and stir fry them for 3-4 minutes.
  3. Add soy sauce, red chilli powder, turmeric powder, ginger - garlic paste and salt. Mix well. Stir fry on a medium flame till the mixture becomes little sticky. Switch off the flame.
  4. On two bread slices sprinkle some dry chutney, then put some carrot mixture, again sprinkle some dry chutney and then cover with other bread slice.
  5. Put this sandwich in the sandwich maker. When they are done serve hot with any sauce.

केळीचा रायता (Banana Raita)


साहित्य

  • पिकलेली केळी: ३
  • वाळलेले बारीक खोबरे: १/२ कप
  • लिंबू: १
  • वेनिला किंवा साधे दही: १ कप
  • बारीक कापलेले बदाम: १ टेबल स्पून
कृती
वाळलेले बारीक खोबरे कोरडे च तांबुस होईपर्यंत भाजा.
केळ्यांचे तुमच्या आवडीनुसार काप करा. त्या कापांना लिंबाचा रस चांगला लावा म्हणजे केळी काळी पडणार नाहीत.
त्या कापांमधे दही, खोबरे आणि बदाम टाकून चांगले एकत्र करा. झाला तुमचा रायता तयार.
तुम्ही हा रायता गार करून किंवा तसाच खाऊ शकता. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्यात थोडी साखर घालू शकता.
हा रायता तुम्ही साइड डिश म्हणून किंवा स्नॅक म्हणून तसेच खाऊ शकता.

Banana Raita
Ingredients
  • Rippen Bananas: 3
  • Dry Shredded Coconut: 1/2 Cup
  • Lemon or Lime: 1
  • Vanilla or Plain Yogurt: 1 Cup
  • Finely Chopped Almonds (Optional)
Procedure
  1. Dry roast shredded coconut till it gets light brown.
  2. Cut bananas into approximately 2 inches or very small pieces.
  3. Squeeze lemon juice over banana pieces to keep them fron browning.
  4. Coat banana pieces with yogurt and roasted coconut.
  5. Add almond pieces & mix well. Chilled this raita and serve as a side dish or snack.

सफरचंद - स्ट्रॉबेरी मिल्कशेक




साहित्य
स्ट्रॉबेरी: ५
सफरचंद: १/२
गार दूध: २ वाटी
साखर: २ स्पून
बदाम: २
काजू: २
वेलदोडा पूड: २ चिमुटभर


कृती:

१) स्ट्रॉबेरी चांगल्या धुवून घ्या. सफरचंद आणि स्ट्रॉबेरी चे बारीक तुकडे करा. 2

2) नंतर सगळे साहित्य मिक्सर मधे टाकून बारीक करा. ५ मिनिटं च्या आत तुमचा मिल्कशेक तयार झाला

टिप

  • तुमच्या आवडीची बाकीचे फळे वापरुन तुम्ही वेगवेगळे प्रकारचे मिल्कशेक तयार करू शकता. उन्हाळ्यामधे भर दुपारी अशा प्रकारचे झटपट होणारे मिल्कशेक प्यायला काही हरकत नाही.
  • तुम्हाला पाहिजे आसेल तर त्यात तुम्ही तुमच्या आवडीचे आइस क्रीम सुधा घालू शकता।

Apple Strawberry Milkshake

Ingredients

  • Strawberries: 5-6
  • Apple: Half
  • Cold Milk: 2 Cups
  • Sugar: 2 tsp
  • Almonds: 2
  • Cashew: 2
  • Cardamom Powder: 2 Pinch

Procedure

  • Wash strawberries with water very well. Cut strawberries and apple into small pieces.
  • Blend all above ingredients into blender till it you get very smooth mixture.
  • Serve this shake in glass.

Tips

  • Instead of apple, strawberries you can use fruits that you like.
  • You can use ice -cream of your choice in this shake.

पौष्टिक टोमॅटो कुलर (Healthy Tomato Cooler)




साहित्य

टोमॅटो: ३
साखर: १ टी स्पून
चाट मसाला: १/२ - १ टी स्पून
लिंबू: १
पाणी: १ वाटी
पुदीना: २-३ पाने
बर्फाचे तुकडे: ५-६
चवीनुसार मीठ

कृती
उकळत्या पाण्यात टोमॅटो ५-६ मिनेटे शिजवा. थोड्यावेळाने त्या टोमॅटो चे साल काढून पुदीना पाने घालून चांगले बारीक करून घ्या. वाटल्यास ते बारीक करताना थोडे पाणी घाला. मग हा रस गाळुन घ्या. रस गाळुन जो पल्प राहील तो कुठल्याही भाजित घाला आणि रस गार होण्यासाठी थोडावेळ फ्रीज़ मधे ठेवा. टोमॅटो चा रस चांगला गार झाल्यावर बाकीचे सगळे साहित्य चांगले एकत्र करून परत एकदा ब्लेण्ड करून घ्या आणि लगेच प्यायला द्या.

आता उन्हाळा आलाच आहे तेव्हा एखाद्या दुपारी हे कुलर तयार करायला काही हरकत नाही आणि ह्यात टोमॅटो असल्यामुळे हे पौष्टिक पण आहे.



Healthy Tomato Cooler

Ingredients:
  • Tomato: 3
  • Sugar: 1 & 1/2 tsp
  • Pepper Powder: 2 Pinches
  • Chat Masala: 1/2 to 1 tsp
  • Lemon Juice: 1 tbsp (Optional)
  • Water: 1 Cup
  • Ice Cubes (Crushed): 5-6
  • Mint Leaves: 2-3
  • Salt to Taste
Procedure:
  1. Blanch tomatoes in boiling water for 5 minutes.
  2. Remove, peel and blend with mint leaves. Strain, cool and chill well. Use remaining pulp in any sabji.
  3. Just before serving, put all remaining ingredients in a mixie. Blend well and serve immediately.