Showing posts with label भाजी. Show all posts
Showing posts with label भाजी. Show all posts

राजमा (Rajma Curry)



*** Rajma Curry English Version ***

साहित्य:

  • राजमा :२कप

  • बारीक चिरलेला कांदाः १ कप

  • बारीक चिरलेला टोमॅटो: २ कप

  • आले - लसुण पेस्टः २ टी स्पून

  • बारीक चिरलेली हिरवी मिरचीः ३-४

  • लाल मिरची पुडः चवीनुसार

  • धणे पुडः २ टी स्पून

  • जीरे पुडः १ टी स्पून

  • आमचुर पावडरः १ टी स्पून

  • बारिक चिरलेली कोथिंबीर: १ टेबल स्पून

  • खोवलेले ताजे खोबरेः १ टेबल स्पून

  • तेलः १ टेबल स्पून

  • चवीनुसार मीठ


कृती
:
  • राजमा भरपुर पाण्यात ७-८ तास भिजत ठेवा. हा राजमा कुकर मध्ये ३-४ शिट्या होईपर्यंत शिजवा. राजमा शिजवताना त्यात थोडे मीठ टाका.
  • एका भांड्यामध्ये तेल गरम करा. त्यात हिरवी मिरची टाकुन चांगली भाजू द्या. नंतर त्यात आले लसूण पेस्ट टाकून मिनिट भर चांगले परतू द्या.
  • नंतर कांदा टाकून चांगला तांबुस होईपर्यंत भाजा. नंतर टोमॅटो टाकून ३-४ मिनिटे चांगले शिजू द्या.
  • नंतर सगळे मसाले टाका आणि हा मसाला चांगला एकत्र करून २-३ मिनिटे भाजू द्या.
  • नंतर शिजवलेला राजमा, मीठ आणि गरजे पुरते पाणी टाका. हा राजमा चांगला उकळी येईपर्यंत शिजू द्या.
  • हा राजमा एका वाटीमध्ये किंवा सर्विंग बोल मध्ये काढा. त्यावर कोथिंबीर आणि खोबरे भुरभुरा.हा गरमागरम राजमा चपाती किंवा भाताबरोबर छान लागेल.

दुधी मसाला (Bottle Gourd Masala)




*** Dudhi Masala (Bottle Gourd Masala) : Read English Version ***


साहित्य:
  • लहान दुधी: १
  • कडीपत्ता: ५-६ पाने
  • कांद्याचा मसाला: २ टी स्पून
  • हिंग: २ चिमूटभर
  • तेल: १ टेबल स्पून
  • चवीनुसार मीठ

मसाल्याचे साहित्य:

  • तुर डाळ: १ टेबल स्पून
  • तिळ: १ टेबल स्पून
  • धणे: १ टी स्पून
  • किसलेले खोबरे: १ टेबल स्पून
  • शेंगदाणे: १ टेबल स्पून
  • आले लसूण पेस्ट: १ टी स्पून


कृती:

तुर डाळ, तिळ, धणे, खोबरे, शेंगदाणे लालसर होईपर्यंत भाजा. हे भाजलेले साहित्य थोडे गार होऊ द्या. नंतर मसाल्याचे सगळे साहित्य मिक्सर मधे पाणी घालून चांगले बारीक करा. ( मसाला बारीक होण्याइतकेच पाणी घाला. जास्त पाणी घालू नका.)

दुधी चे साल काढून बारीक तुकडे करा. एका कढई मधे तेल गरम करा. त्या तेलात कडीपत्ता आणि हिंग टाका. कडीपत्ता चांगला उडाला की त्यात बारीक केलेला मसाला टाका. हा मसाला चांगले तेल सुटेपर्यंत भाजा ( साधारण ५-६ मिनिटे लागतील). नंतर त्यात कांद्याचा मसाला टाकून १-२ मिनिटे चांगले शिजुन द्या. ह्या शीजलेल्या मसाल्यामधे दुधी चे तुकडे टाकून चांगले हलवा. १ मिनिटे झाल्यानंतर मीठ टाका आणि कढई वर झाकण ठेऊन भाजी २ मिनिटे शिजू द्या. दुधी जरा पारदर्शक झाली की जरा गरम पाणी टाकून भाजी चांगली शिजू द्या.

ह्या शीजलेल्या भाजीवर चिरलेली कोथिंबीर टाका. ही भाजी चपाती, फुलका, रोटी किंवा भाताबरोबर खायला द्या.

चने जैसलमेर के (Chane Jaisalmer Ke)


साहित्य
  • काळे चने (हरभरा): १ कप
  • मध्यम आकाराचा कांदा: २
  • कापलेली हिरवी मिरची: ३-४
  • बारीक कापलेली कोथिंबीर: १ कप
  • दही: १ आणि १/२ कप
  • गरम मसाला: १ टी स्पून
  • चाट मसाला: २ टी स्पून
  • धणे पूड: २ टी स्पून
  • लाल मिरची पूड: १ टी स्पून
  • हळद: १ टी स्पून
  • बेसन: ४ टी स्पून
  • हिंग: १/४ टी स्पून
  • दालचिनी: १
  • जीरे: १ टी स्पून
  • काळे वेलदोडे: २-३
  • लवंग: ५-६
  • तूप: २ टी स्पून
  • तेल: २ टी स्पून
  • चवीनुसार मीठ
कृती
  • आदल्या दिवशी रात्री हरभरे ४ कप पाण्यामधे भिजत ठेवा. जुने पाणी काढून टाका. कुक्कर मधे ६ कप पाणी टाकून हरभरे शिजवून घ्या. हरभरे शिजुन गार झाल्यावर ते थोडे स्मॅशर ने स्मॅश करा.
  • एक जाड बुडाचे भांड्यात तेल आणि तूप गरम करायला ठेवा. ते गरम झाल्यावर त्यात जीरे टाका. जीरे चांगले उडाले की त्यात गरम मसाला टाकून चांगले भाजा. नंतर त्यात हिंग आणि हिरव्या मिरच्या टाकून २-३ मिनिटे भाजा.
  • ते भाजून होईपर्यंत दह्यात १ कप पाणी, बेसन आणि बाकीचे कोरडे मसाले टाकून चांगले मिक्स करा. हे दह्याचे मिश्रण मसाल्या मधे टाका. हे सगळे चांगले एकत्र करा आणि त्याला चांगली उकळी येऊ द्यात. उकळी आल्यावर त्यात हरभरे आणि मीठ टाका. हरभरे चांगले हलवुन भांड्यावर झाकण ठेऊन ५-६ मिनिटे शिजू द्या.
  • नंतर कापलेली कोथिंबीर आणि कांदा टाकून साजवा. ही गरमागरम भाजी चपाती, पुरी किंवा फुलक्याबरोबर खावा.

Chane Jaiselmer Ke
Ingredients:

  • Black Bengal Gram (Kale Chane): 1 Cup
  • Medium Sized Onion: 2
  • Chopped Green Chillies: 3-4
  • Chopped Coriander Leaves: 1 Cup
  • Yogurt: 1 & 1/2 Cup
  • Garam Masala Powder: 1 tsp
  • Coriander Powder: 2 tsp
  • Red Chilli Powder: 1 tsp
  • Turmeric Powder: 1 tsp
  • Chaat Masala: 2 tsp
  • Besan (Gram Flour): 4 tsp
  • Hing (Asafoetida): 1/4 tsp
  • 2 inch Cinnamon: 1
  • Cumin Seeds: 1 tsp
  • Black Cardamoms: 2-3
  • Cloves: 5-6
  • Pure Ghee: 2 tbsp
  • Oil: 2 tbsp
  • Salt to Taste
Procedure

  1. Soak bengal gram overnight in 4 cup water. Drain, mix in 6 cup of water and pressure stir fry till done. Then mash the grams slightly.
  2. Heat up ghee and oil, add cumin seeds, when they crackle mix in the whole garam masala, fry for 1-2 minutes. Mix in asafoetida and chopped green chillies, sautae.
  3. Then mix yogurt, gram flour, 1 cup water and dry spices very well in a bowl.
  4. Then add this yogurt mixture in sautaed whole garam masala. Keep stirring till it boils.
    Then mix in the grams along with the water they were boiled in. Mix in salt to taste. Mix well. Cover and simmer (boil slowly at low temperature) for 8-10 minutes.
  5. Serve hot decorated with cut coriander leaves and onion .

बंगाली वांग फ्राय (Bengali Brinjal Fry)




इंग्लिश मधून वाचण्यासाठी इथे टिचकी मारा.

साहित्य
मोठे वांग: १
हळद: १/२ टीस्पुन
लाल मिरची पुड: २ टीस्पुन
रवा: १ टीस्पुन
तांदळाचे पीठ: १ टीस्पुन
धणे पुड: १ टीस्पुन
जीरे पुड: १ टीस्पुन
चवीनुसार मीठ
तेल

कृती
१) वांग चांगले धुवून घेऊन त्याचे अर्धा इंच लांबीचे गोल काप करावेत.
२) बाकीचे सगळे कोरडे साहित्य नीट एकत्र करून घावे. हे एकत्र केलेले साहित्य वांग्याच्या कापांना नीट लावा.
३) एका तव्यात तेल गरम करून त्यात हे काप ठेवा. १-२ वेळा काप उलटा. हे काप तांबुस रंगाचे होईपर्यंत भाजा. सगळे काप भाजून घ्या.
४) ह्या भाजलेल्या कापांवर कोथिंबीर भूरभुरा आणि गरमागरम भाताबरोबर, डाळी बरोबरा किंवा चपाती बरोबर खावा.

टिप:
वाटल्यास तुम्ही हे काप ग्रील वर किंवा ओवन मधे भाजू शकाता.

सौजन्य:
वाह शेफ