प्रत्येकी एक टे. स्पून शेंगदाण्याचा कुट किंवा बदाम पूड आणि तूप
२-३ कप पाणी
एक टी स्पून ओवा
चवीपुरते मीठ, मिरे पूड
सजावटी साठी किसलेले खोबरे
कृती :
सगळ्यात आधी एक कप पाण्यात नाचणीचे पीठ कालवून पातळ पेस्ट तयार करा.
एका भांड्यामध्ये तूप गरम करून त्यात लसुणाची फोडणी करून ओवा, थोडे मीठ आणि मेथी टाका. मेथी थोडी हलवा आणि २-३ मिनिटे शिजू द्या.
नंतर त्यात उरलेले पाणी, थोडे मीठ, मिरे पूड, शेंगदाण्याचा कुट किंवा बदाम पूड घाला. हा सूप गार झाला कि थोडा घट्ट होतो त्यामुळे पाणी जरा जास्तच घाला.
पाणी चांगले उकळले कि त्यात नाचणीची पेस्ट टाकून थोड्या थोड्या वेळाने हलवत राहा. ४-५ मिनिटे सूप चांगला शिजू द्या. हा गरमागरम सूप बोल मध्ये काढून त्यावर खोबरे टाकून खायला द्या.