Showing posts with label चटणी. Show all posts
Showing posts with label चटणी. Show all posts

चिंचेची चटणी (Tamarind Chutney)



साहित्य:
  • चिंच : १/२ वाटी किंवा चिंचेचा तयार कोळ: १/४ वाटी
  • बिया काढलेले खजूर: १/२ वाटी
  • गुळ: १/४ वाटी
  • लाल मिरची पूड: १ टी स्पून
  • जीरे पूड: १ टी स्पून
  • धणे पूड: १ टी स्पून
  • चवीनुसार मीठ
कृती:
चिंच आणि खजूर चांगले धुवून घ्या। एका मोठ्या वाटी मधे १ वाटी पाणी घालून चिंच आणि खजूर ५-६ तास भिजत ठेवा. नंतर सगळे साहित्य मिक्सर मधे चांगले बारीक करा. गरज लागली तर थोडे पाणी टाका. ही पेस्ट गाळणीने गाळुन घ्या आणि बाटलीमधे भरून ठेवा. ही चटणी फ्रीज़ मधे महिना भर छान टिकते.
जर तुम्ही घाईत असाल तर ४ वाटी पाणी घालून सगळे साहित्य एकत्र करून चांगले २०-२५ मिनिटे उकळून घ्या आणि बाकीची कृती तशीच करा.


Tamarind Chutney

Ingredients:
  • Deseeded Tamarind / Imli : 1/2 Cup or Tamarind Pulp: 1/4 Cup
  • Deseeded Dates / Khajur: 1/2 Cup
  • Jaggery / Gur: 1/4 Cup
  • Red Chilli Powder: 1 tsp (Adjust as per taste)
  • Cumin Powder: 1 tsp
  • Coriander Powder: 1 tsp
  • Salt to Taste
Procedure:
  1. Wash dates and tamarind and place them in a bowl. Add 1 cup water & keep aside for 5-6 hrs.
  2. After 5-6 hrs, blend all ingredients in a blender until smooth. If required add some water.
  3. Strain the mixture through sieve.
  4. Keep this chutney in a air- tight container.
  5. Keep it refrigerated. It will remain good for atleast 3weeks.
Tips
  • If you are in hurry, you can place all ingredients and 4 cups water in a saucepan. Boil for 20-25 minutes. Strain it.
  • The chutney should be little bit sweet than sour.

लसूण चटणी (Garlic Chutney)

साहित्य:
  • सोललेला लसूण: १ वाटी
  • लाल मिरची पूड: १ टेबल स्पून
  • लिंबाचा रस: १ टेबल स्पून
  • चवीनुसार मीठ
कृती:
सगळे साहित्य एकत्र करून मिक्सर मधे बारीक करा. झाली तुमची चटणी तयार. ही चटणी हवाबंद बाटलीत ठेऊन फ्रीज़ मधे ठेवा. कमीत कमी १ महिना तरी चांगली टिकेल. जरूरी प्रमाणे चटणी काढून घ्या आणि त्यात थोडे पाणी टाकून मग ती चटणी वापरा. ही चटणी तुम्ही कुठल्याही स्नॅक बरोबर खाउ शकता.




Garlic Chutney

Ingredients:

  • Garlic Cloves, Peeled: 1 Cup
  • Chilli Powder: 1 tbsp
  • Lemon Juice: 1 tbsp
  • Salt to Taste
Procedure
  1. Combine all ingredients and blend it with 1/4 cup of water to smooth paste. Keep it refrigerated.
  2. Before using, dilute with water and use as required.

दोड्क्याच्या शिरांची चटणी (Ridge Gourd Skin Chutney)



साहित्य:
दोड्क्याच्या शीरा: २ वाटी
तीळ: १ टेबलस्पून
सुक्या खोबर्‍या चा कीस: १ टेबलस्पून
जीरे: १ टीस्पून
चवीनुसार मीठ अणि लाल मिरची पुड

कृती:
तीळ, खोबरे आणि जीरे भाजून घावेत. नंतर दोड्क्याच्या शिरा कुरकुरीत होईपर्यंत परताव्यात. सगळे भाजलेले साहित्य गार झाल्यावर मीठ आणि लाल मिरची पाउडर घालून मिक्सर मधे बारीक करून घावे. ही चटणी हवाबंद डब्यात ठेवा भरपूर दिवस टिकेल.

ही चटणी तुम्ही चपाती आणि भाता बरोबर तशीच खाऊ शकता किंवा थोडे दही घालून कोणत्याही भजी, डोसा, इडली इत्यादी बरोबर खावे.



Dodkhyachya Shiryanchi Chutney (Dry Ridge Gourd Skin Chutney)

Ingredient
Dodkyahcya Shira (Ridge Gourd Skin): 2 Cups
Sesame Seeds: 1 tbsp
Dry Shredded Coconut: 1 tbsp
Jeera (Cumin Seeds): 1 tsp
Red Chilli Powder to Taste
Salt to Taste

Procedure
  1. Dry roast cumin seeds, coconut, sesame seeds till golden brown & keep aside.
  2. Fry skin on the pan till it get crispy. It will take approximately 9-10 minutes. Let it cool for a while.
  3. Grind all the ingredients to coarse or fine consistency.
  4. Store this chutney in air tight container. This chutney will remain good for a month.
  5. Just like dry peanut chutney, you can serve this chutney with any snack, with roti.