Showing posts with label भाजी: :कडधान्य. Show all posts
Showing posts with label भाजी: :कडधान्य. Show all posts

मूग सोयाबीन सूप (Moong Soyabean Soup)





साहित्य :
  • एक कप मूग
  • अर्धा कप सोयाबीन / सोयाबीन ग्रनुअल्स / सोयाबीन चन्क्स
  • दोन टोमॅटो
  • दोन टे. स्पून तूप
  • ३-४ लसूण पाकळ्या
  • चवीनुसार मीठ, मीरे पूड, धने पूड, जिरे पूड, लाल तिखट पूड

कृती :
  • मूग, सोयाबीन आणि टोमॅटो कुकर मध्ये चांगले शिजवून घ्या. 
  • लसूण बारीक किसून घ्या नाहीतर बारीक कापून घ्या. 
  • शिजवलेल्या मूग, सोयाबीन आणि टोमॅटो चांगली बारीक पेस्ट करून घ्या. 
  • एका जाड बुडाच्या भांडयामध्ये तूप गरम करून घ्या. त्या तुपात लसूण टाकून लालसर होइपर्यंत भाजा. 
  • नंतर त्यात सगळे मसाले टाकून १० -१५ सेकंद हलवा. 
  • नंतर त्यात भाज्यांची पेस्ट, मीठ आणि गरजेपुरते पाणी घालून चांगले उकळून घ्या.झाला तुमचा मूग सोयाबीन सूप तयार.



तृप्ती
Fashion Deals For Less





हिरव्या वाटाण्याचा सुप (Green Peas Soup)


**** Green Peas Soup: Click Here For English Version ****

साहित्यः
  • ताजे किंवा फ्रोजन हिरवे वाटाणेः २ कप
  • ताजे किंवा फ्रोजन कणसाचे दाणेः १ कप
  • नारळाचे दुधः १ कप
  • कापलेला कांदाः १ कप
  • कापलेले आले - लसुणः १/२ टेबल स्पून
  • लोणीः १ टेबल स्पून
  • वेजिटेबल स्टॉक किंवा चिकन स्टॉक किंवा पाणीः ३-४ कप
  • चविनुसार मीठ , लाल मिरची पुड, मीरे पुड

कृतीः
  • एका उभ्या भांड्यामध्ये लोणी गरम करा. त्यात कांदा आणि आले - लसुण टाकून कांदा पारदर्शक होइपर्यंत भाजा.
  • नंतर त्यात वाटाणा आणि कणसाचे दाणे टाकून चांगले मिसळून ३-४ मिनिटे शिजू द्या.
  • त्यात लाल मिरची पुड आणि मीरे पुड टाकून चांगले हलवा.
  • नंतर त्यात नारळाचे दुध, मीठ आणि वेजिटेबल स्टॉक किंवा चिकन स्टॉक किंवा पाणी टाका.
  • हे सगळे वाटाणा आणि कणसाचे दाणे चांगले माउ होइपर्यंत शिजवा.
  • नंतर भांडे बाजुला ठेउन मिश्रण थोडे गार होण्यासाठी ठेउन द्या.
  • थोड्यावेळाने हे मिश्रण ब्लेंडर मधून बारिक करून घ्या. हवे असल्यास अजून पाणी किंवा स्टॉक घाला.
  • एका बोल मध्ये हा सुप घालून त्यावर दही किंवा क्रिम ने सजावट करा. हा सुप तुम्ही गरमागरम अथवा गार पियू शकता.

राजमा (Rajma Curry)



*** Rajma Curry English Version ***

साहित्य:

  • राजमा :२कप

  • बारीक चिरलेला कांदाः १ कप

  • बारीक चिरलेला टोमॅटो: २ कप

  • आले - लसुण पेस्टः २ टी स्पून

  • बारीक चिरलेली हिरवी मिरचीः ३-४

  • लाल मिरची पुडः चवीनुसार

  • धणे पुडः २ टी स्पून

  • जीरे पुडः १ टी स्पून

  • आमचुर पावडरः १ टी स्पून

  • बारिक चिरलेली कोथिंबीर: १ टेबल स्पून

  • खोवलेले ताजे खोबरेः १ टेबल स्पून

  • तेलः १ टेबल स्पून

  • चवीनुसार मीठ


कृती
:
  • राजमा भरपुर पाण्यात - तास भिजत ठेवा. हा राजमा कुकर मध्ये - शिट्या होईपर्यंत शिजवा. राजमा शिजवताना त्यात थोडे मीठ टाका.
  • एका भांड्यामध्ये तेल गरम करा. त्यात हिरवी मिरची टाकुन चांगली भाजू द्या. नंतर त्यात आले लसूण पेस्ट टाकून मिनिट भर चांगले परतू द्या.
  • नंतर कांदा टाकून चांगला तांबुस होईपर्यंत भाजा. नंतर टोमॅटो टाकून - मिनिटे चांगले शिजू द्या.
  • नंतर सगळे मसाले टाका आणि हा मसाला चांगला एकत्र करून - मिनिटे भाजू द्या.
  • नंतर शिजवलेला राजमा, मीठ आणि गरजे पुरते पाणी टाका. हा राजमा चांगला उकळी येईपर्यंत शिजू द्या.
  • हा राजमा एका वाटीमध्ये किंवा सर्विंग बोल मध्ये काढा. त्यावर कोथिंबीर आणि खोबरे भुरभुरा.हा गरमागरम राजमा चपाती किंवा भाताबरोबर छान लागेल.