Ruchira August Maher
तृप्ती
Fashion Deals For Less
Showing posts with label सूप. Show all posts
Showing posts with label सूप. Show all posts
मूग सोयाबीन सूप (Moong Soyabean Soup)
साहित्य :
- एक कप मूग
- अर्धा कप सोयाबीन / सोयाबीन ग्रनुअल्स / सोयाबीन चन्क्स
- दोन टोमॅटो
- दोन टे. स्पून तूप
- ३-४ लसूण पाकळ्या
- चवीनुसार मीठ, मीरे पूड, धने पूड, जिरे पूड, लाल तिखट पूड
कृती :
- मूग, सोयाबीन आणि टोमॅटो कुकर मध्ये चांगले शिजवून घ्या.
- लसूण बारीक किसून घ्या नाहीतर बारीक कापून घ्या.
- शिजवलेल्या मूग, सोयाबीन
आणि टोमॅटो चांगली बारीक पेस्ट करून घ्या. - एका जाड बुडाच्या भांडयामध्ये तूप गरम करून घ्या. त्या तुपात लसूण टाकून लालसर होइपर्यंत भाजा.
- नंतर त्यात सगळे मसाले टाकून १० -१५ सेकंद हलवा.
- नंतर त्यात भाज्यांची पेस्ट, मीठ आणि गरजेपुरते पाणी घालून चांगले उकळून घ्या.झाला तुमचा मूग सोयाबीन सूप तयार.
तृप्ती
Fashion Deals For Less
मेथी नाचणी सूप (Methi Ragi Soup)
Methi Ragi Soup
तृप्ती
Fashion Deals For Less
साहित्य:
- एक टे. स्पून नाचणीचे पीठ
- एक कप बारीक चिरलेली मेथी
- थोडा बारीक किसलेला लसूण
- प्रत्येकी एक टे. स्पून शेंगदाण्याचा कुट किंवा बदाम पूड आणि तूप
- २-३ कप पाणी
- एक टी स्पून ओवा
- चवीपुरते मीठ, मिरे पूड
- सजावटी साठी किसलेले खोबरे
कृती :
- सगळ्यात आधी एक कप पाण्यात नाचणीचे पीठ कालवून पातळ पेस्ट तयार करा.
- एका भांड्यामध्ये तूप गरम करून त्यात लसुणाची फोडणी करून ओवा, थोडे मीठ आणि मेथी टाका. मेथी थोडी हलवा आणि २-३ मिनिटे शिजू द्या.
- नंतर त्यात उरलेले पाणी, थोडे मीठ, मिरे पूड, शेंगदाण्याचा कुट किंवा बदाम पूड घाला. हा सूप गार झाला कि थोडा घट्ट होतो त्यामुळे पाणी जरा जास्तच घाला.
- पाणी चांगले उकळले कि त्यात नाचणीची पेस्ट टाकून थोड्या थोड्या वेळाने हलवत राहा. ४-५ मिनिटे सूप चांगला शिजू द्या. हा गरमागरम सूप बोल मध्ये काढून त्यावर खोबरे टाकून खायला द्या.
तृप्ती
Fashion Deals For Less
गाजर सफरचंद सुप (Carrot Apple Soup)
Carrot Apple Soup
साहित्यः
- २ मोठे गाजर
- १ मध्यम आकाराचे सफरचंद
- १ मध्यम आकाराचा कान्दा (कापलेला)
- २ टेबल स्पून लोणी / तुप
- १ टी स्पून बारीक किसलेले आले
- गरजेपुरता वेजिटेबल स्टॉक / चिकन स्टॉक/ पाणी
- चवीनुसार मीठ आणि मीरे पुड
कृती:
- गाजर आणि सफरचंदाचे साल कढून घेऊन त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करा.
- एका जाड बुडाच्या भांडयामध्ये लोणी गरम करायला ठेवा. लोणी गरम झाल्यावर त्यात कांदा टाका. हा कांदा लालसर होईपर्यंत भाजा.
- नंतर त्यात कापलेले गाजर, सफरचंद, आले, मीठ, मीरे पुड, वेजिटेबल स्टॉक / चिकन स्टॉक/ पाणी घालून चांगले हलावा. ह्या मिश्रणालाचांगली उकळी आली की भांडयावर झाकण ठेवून मंद आचेवर थोडावेळ शीजू द्या. गाजर शिजले की भांडे बाजुला काढा.
- हे मिश्रण मिक्सर मध्ये घालून चांगले बारिक करून घ्या. एक भांडयामध्ये हा सुप परत गरम करा. हा गरमागरम सुप कोणालाही कधीही प्यायला आवडेल.
तृप्ती
Fashion Deals For Less
हिरव्या वाटाण्याचा सुप (Green Peas Soup)

**** Green Peas Soup: Click Here For English Version ****
साहित्यः
- ताजे किंवा फ्रोजन हिरवे वाटाणेः २ कप
- ताजे किंवा फ्रोजन कणसाचे दाणेः १ कप
- नारळाचे दुधः १ कप
- कापलेला कांदाः १ कप
- कापलेले आले - लसुणः १/२ टेबल स्पून
- लोणीः १ टेबल स्पून
- वेजिटेबल स्टॉक किंवा चिकन स्टॉक किंवा पाणीः ३-४ कप
- चविनुसार मीठ , लाल मिरची पुड, मीरे पुड
कृतीः
- एका उभ्या भांड्यामध्ये लोणी गरम करा. त्यात कांदा आणि आले - लसुण टाकून कांदा पारदर्शक होइपर्यंत भाजा.
- नंतर त्यात वाटाणा आणि कणसाचे दाणे टाकून चांगले मिसळून ३-४ मिनिटे शिजू द्या.
- त्यात लाल मिरची पुड आणि मीरे पुड टाकून चांगले हलवा.
- नंतर त्यात नारळाचे दुध, मीठ आणि वेजिटेबल स्टॉक किंवा चिकन स्टॉक किंवा पाणी टाका.
- हे सगळे वाटाणा आणि कणसाचे दाणे चांगले माउ होइपर्यंत शिजवा.
- नंतर भांडे बाजुला ठेउन मिश्रण थोडे गार होण्यासाठी ठेउन द्या.
- थोड्यावेळाने हे मिश्रण ब्लेंडर मधून बारिक करून घ्या. हवे असल्यास अजून पाणी किंवा स्टॉक घाला.
- एका बोल मध्ये हा सुप घालून त्यावर दही किंवा क्रिम ने सजावट करा. हा सुप तुम्ही गरमागरम अथवा गार पियू शकता.
काकडीचा गार सूप (Chilled Cucumber Soup )

*** Chilled Cucumber Soup : English Version Here ***
साहित्य:
- मोठी काकडी: १
- गार दही: १ कप
- शेपू: १ टेबल स्पून
- कोथिंबीर: १ टेबल स्पून
- लिंबाचा रस: १/२ टेबल स्पून किंवा अधिक
- बारीक किसलेले आले: गरजेनुसार
- चवीनुसार मीठ आणि मीरे पूड
कृती:
काकडी चे साल काढून ती उभी चिरा. बिया काढा आणि काकडी चे बारीक तुकडे करा. हे काकडी चे तुकडे एका मोठ्या वाटीत ठेऊन त्यात मीठ टाका आणि चांगले मिक्स करा. नंतर ही काकडी चाळणी मधे ५-१० मिनिटे ठेवा जेणेकरून जादा चे पाणी निघून जाईल. नंतर सगळे साहित्य एका फुड प्रोसेसर मधे घालून बारीक पेस्ट करा. ही पेस्ट एका भांड्यात काढून हे भांडे पेस्ट गार होण्यासाठी फीज़ मधे ठेवा. हा गार सूप एका बाउल मधे काढा, काकडी च्या चकतीने किंवा शेपू च्या पानाने साजवा आणि गार गार प्यायला द्या.
हनी ड्यू मेलन आणि खरबूज सूप

*** Honeydew Melon and Cantaloupe Soup *** Click Here For English Version
साहित्य:
- हनी ड्यू मेलन लहान तुकडे केलेले: १ कप
- खरबूज लहान तुकडे केलेले: २ कप
- लिंबाचा रस: १/४ कप
- साखर: १ टी स्पून (किंवा अधिक)
- चवीनुसार मीठ आणि मिरे पूड
- पुदीना किंवा कोथिंबीर ची पाने
कृती:
एका मिक्सर च्या भांड्यात पुदीना किंवा कोथिंबीर ची पाने सोडून सगळे साहित्य टाका आणि एकदम बारीक पेस्ट तयार करा. ही पेस्ट एका भांड्यामधे काढून फ्रीज़ मधे २-३ तास गार होण्यासाठी ठेवा. हा सूप प्यायला देताना एका बाउल मधे सूप काढा आणि त्यावर मीरे पूड आणि पुदीना किंवा कोथिंबीर ची पाने टाका. असा हा गार सूप उन्ह्याच्या दिवसात कोणालाही आवडेल.
कटाची आमटी (Chana Daal Rassam)
Katachi Aamati

इंग्लिश मधून वाचण्यासाठी इथे टिचकी मारा.
कृती
१) उकडलेली डाळ पाणी घालून बारीक करून घ्या. पाणी थोडे जास्त घातले तरी चालेल.
२) तीळ, खोबरे आणि कांदा वेगवेगळे भाजून घ्या. कांदा भाजताना थोडे तेल घालावे. भाजलेले साहित्य गार झाल्यावर आले - लसूण पेस्ट घालून बारीक करून घ्यावे. गरज पडली तर थोडे पाणी घालावे.
३) एका पातेल्यात तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात जीरे, कढीपत्ता, हिंग ची फोडणी करा. नंतर त्यात बारीक केलेला कांदा, खोबरे इत्यादीची पेस्ट घाला. पेस्ट नीट हलवा. जोपर्यंत मसाला तेल सोडायला सुरूवात करत नाही तोपर्यंत मसाला हलवा. नंतर कांद्याचा मसाला टाकून ३-४ मिनिटे भाजा.
४) नंतर कट आणि डाळीची पेस्ट टाका. गरज असेल तर थोडे पाणी टाका. आमटीला थोडी उकळी आल्यावर त्यात चवीनुसार मीठ, चिंच आणि गुळ टाका. आमटी परत २-३ मिनिटे उकळू द्या.
५) आमटी झाल्यावर चिरलेली कोथिंबीर भूरभुरा. ही आमटी गरमा गरम पियू शकता किवा पुरणपोळी बरोबर किवा गरमागरम भाताबरोबर खाऊ शकता.

इंग्लिश मधून वाचण्यासाठी इथे टिचकी मारा.
साहित्य
कट (चणा डाळ जास्त पाण्यात उकडून घेऊन डाळ बाजूला काढून उरलेले पाणी): २ वाटी
शीजलेली चणा डाळ: १/४ वाटी
कढीपत्ता: ६-७ पाने
कापलेला कांदा: १/२ वाटी
वाळलेले खोबरे: १ टेबल स्पून
आले - लसूण पेस्ट: १ टीस्पून
तीळ: १ टीस्पून
जीरे: १ टीस्पून
हिंग चिमूटभर
कांद्याचा मसाला: २ टेबल स्पून
बारीक कापॅलेली कोथिन्बीर
चिंचेचा कोळ: २ टीस्पून
गुळ: १ टीस्पून
चवीनुसार मीठ
तेल
पाणी
कृती
१) उकडलेली डाळ पाणी घालून बारीक करून घ्या. पाणी थोडे जास्त घातले तरी चालेल.
२) तीळ, खोबरे आणि कांदा वेगवेगळे भाजून घ्या. कांदा भाजताना थोडे तेल घालावे. भाजलेले साहित्य गार झाल्यावर आले - लसूण पेस्ट घालून बारीक करून घ्यावे. गरज पडली तर थोडे पाणी घालावे.
३) एका पातेल्यात तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात जीरे, कढीपत्ता, हिंग ची फोडणी करा. नंतर त्यात बारीक केलेला कांदा, खोबरे इत्यादीची पेस्ट घाला. पेस्ट नीट हलवा. जोपर्यंत मसाला तेल सोडायला सुरूवात करत नाही तोपर्यंत मसाला हलवा. नंतर कांद्याचा मसाला टाकून ३-४ मिनिटे भाजा.
४) नंतर कट आणि डाळीची पेस्ट टाका. गरज असेल तर थोडे पाणी टाका. आमटीला थोडी उकळी आल्यावर त्यात चवीनुसार मीठ, चिंच आणि गुळ टाका. आमटी परत २-३ मिनिटे उकळू द्या.
५) आमटी झाल्यावर चिरलेली कोथिंबीर भूरभुरा. ही आमटी गरमा गरम पियू शकता किवा पुरणपोळी बरोबर किवा गरमागरम भाताबरोबर खाऊ शकता.
Subscribe to:
Posts (Atom)


