
*** Thandai - Almond Spices Milk ***
- बदाम: १/२ कप
- दुध: १ - १/२ कप
- साखर: ४ टेबल स्पून
- मिरे: १ टी स्पून
- बडीशोप: १ टेबल स्पून
- खसखस: २ टेबल स्पून
- अक्खे वेलदोडे: ४
- गुलाब पाणी: २ टेबल स्पून
- गरजेनुसार पाणी
कृती:
- सगळे बदाम भरपूर पाण्यात ५-६ तास भिजत ठेवा त्याचे साल काढून बाजूला ठेवा.
- खसखस, वेलदोडे, मिरे, बडीशोप ची बारीक़ पुड करून घ्या.
- एका ब्लेंडरमधे थोड़े पाणी घालून बदाम ची छान पेस्ट करून घ्या. नंतर मसाल्याची पुड दूध साखर टाकुन परत एकदा सगळे चांगले बारीक़ करून घ्या.
- हे सगळे मिश्रण बारीक़ चाळनिमधुन गाळुन घ्या. उरलेला गाळ थोड़े पाणी टाकुन परत एकदा ब्लेंड करून आणि गाळुन घ्या.
- त्यात गुलाबाचे पाणी टाकुन चांगले एकत्र करा.एका ग्लास मधे बर्फ टाका आणि त्यात थंडाई ओता.आता कशाची ही वाट न बघता ही थंडाई पियुन टाका. :)
माहितीचा स्त्रोत : सौ. मंजुला




